नाट्य संमेलन ठरणार विशेष; बहुभाषिक नाट्यप्रयोग अन्‌ सबटायटलिंग!

This year's drama will be special
This year's drama will be special

नागपूर : शंभरावे मराठी नाट्य संमेलन मोठ्या गाज्यावाज्यात आयोजित करण्याचा मानस बाळगणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाटयपरिषद नवीन पायंडा घालण्याच्या प्रयत्न आहे. यंदा प्रथमच नाट्यसंमेलनात बहुभाषिक नाट्यप्रयोगांचे सादरीकरण होणार आहे. विशेष म्हणजे हे नाट्यप्रयोग मराठी रसिकश्रोत्यांना कळावे यासाठी नाट्यपरिषदेने मराठी भाषेत सबटायटलिंग करावे, अशी इच्छा संमेलनाध्यक्ष दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्‍त केली आहे.

शहरात सुरू असलेल्या ऑरेंज सिटी चित्रपट महोत्सवासाठी आलेल्या डॉ. जब्बार पटेल यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, जागतिक रंगभूमीवर सादर होणाऱ्या नाट्य प्रयोगांदरम्यान त्यातील संवाद स्थानिकांना कळावे याउद्देशाने संवादाचे सबटायटलिंग एका स्क्रीनवर दाखविण्यात येते. एक कुशल कारागीर त्यासाठी तत्पर असतो. हा प्रयोग थोडा खर्चिक असल्याने तो इतर नाट्यसंस्थांमध्ये शक्‍य नाही. तरीही अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात होणाऱ्या बहुभाषिक नाट्यप्रयोगांचे सबटायटलिंगचा करण्याची गरज आहे.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी रंगभूमीचे जनक व्यंकोजी राजे यांच्या तंजावर येथील समाधी परिसरातूर प्रारंभ होणारे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन सांगली ते मुंबई असा मोठा प्रवास करणार आहे. विशेष म्हणजे नाट्यसंमेलनाची वारी राज्यात फिरणार असून, प्रमुख शहरात व लगतच्या जिल्ह्यांमध्ये नाट्यप्रयोगांचे सादरीकरण होईल. गावागावात अतिशय अल्प खर्चात चित्रपट व लघुपट तयार करणाऱ्यांना या आयोजनाच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळणार असल्याचे डॉ. जब्बार पटेल म्हणाले.

नवोदितांची निर्मिती वेगळ्या तुलनेची

चित्रपट क्षेत्रात अनेक नवोदित दिग्दर्शक येत असून, त्यांच्या कल्पना अतिशय रंजक असतात. त्यांना दिसणारे समाजाचे वास्तव ते कलाकृतीतून पडद्यावर आणण्याचा प्रयत्न करतात. कायमच ठरलेल्या चौकटीत चित्रपट निर्मिती करणाऱ्यांपेक्षा नवोदितांची निर्मिती वेगळ्या तुलनेची असते. शिवाय हे चित्रपट अल्प खर्चात निर्माण झालेले असतात. अशा नवोदितांमुळे चित्रपट सृष्टीचा चेहरा मोहरा बदलत असल्याचे डॉ. जब्बार पटेल म्हणाले.

परदेशातील रंगकर्मींच्या कार्यशाळेचे आयोजन

शंभराव्या नाट्यसंमेलनाच्या हेतूने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सव आयोजित करण्याच्या विचारांत असल्याचे डॉ. जब्बार पटेल यांनी सांगितले. राज्याच्या विविध ठिकाणी असे कार्यक्रम आयोजित करण्याची सूचना स्थानिक नाट्यपरिषदेच्या शाखांना देण्यात आली असल्याचे पटेल यांनी सांगितले. शिवाय विदेशी रंगभूमीवर उपयोगात येणारे तंत्रज्ञान भारतीयांना माहिती व्हावे या उद्देशाने परदेशातील गाजलेल्या रंगकर्मींच्या कार्यशाळेचे आयोजन अ. भा. मराठी नाट्य परिषदेकडून करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com