लग्नासाठी मुलालाच मागितले दोन लाख, नैराश्यातून त्याने उचलले टोकाचे पाऊल

Young man commits suicide as he cannot pay two lakh for marriage
Young man commits suicide as he cannot pay two lakh for marriage
Updated on

नागपूर  : लग्न करण्यापूर्वी दोन लाख रुपयांची मागणी प्रेयसी व तिच्या नातेवाइकांनी केली. ते पैसे देऊ शकत नसल्यामुळे नैराश्‍यात गेलेल्या प्रियकराने विष प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी प्रेयसी, तिची बहीण व जावयाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

रोशन भास्कर खिरे (वय २९, रा. जागृतीनगर) असे आत्महत्या केलेल्या प्रियकराचे नाव आहे.  किरण संगमवार, क्रांती संगमवार आणि संजय संगमवार अशी आरोपींची नावे आहेत. किरण विधवा आहे. चार ते पाच वर्षांपूर्वी तिच्या पतीचा मृत्यू झाला. रोशन बॅगच्या दुकानात कामाला होता. त्याची व तिची ओळख झाली. दोन वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध होते.

त्याने तिच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. तशी तिला मागणी घातली. तिनेही लग्नास होकार दिला. पण, त्याकरिता तिने बहीण व जावयासोबत मिळून कट रचला व रोशनला लग्नापूर्वी दोन लाख रुपये जमा करून देण्यास सांगितले. तेव्हापासून रोशन पैसे गोळा करीत होता. पण, दोन लाख रुपये जमत नव्हते. 

दुसरीकडे प्रेयसी व तिचे कुटुंबीय पैसे दिल्याशिवाय लग्नास तयार नव्हते. आरोपींकडून वारंवार त्याच्याकडून पैशाची मागणी करण्यात येत असल्याने २० नोव्हेंबरला दुपारी त्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी त्याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीच्या आधारावर वाठोडा पोलिसांनी तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला. 

संपादन : अतुल मांगे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com