नोकरीनिमित्त होता पुण्याला वास्तव्याला, आई व बहिणींना भेटायला आला अन्‌...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

खापरखेडा (जि. नागपूर) : नोकरीनिमित्त पुण्याला वास्तव्याला असलेला मुलगा बरेच दिवसांनी घरी आई व बहिणींना भेटायला आला. दहा-बारा दिवसांनी तो गुरुवारी पुण्याला परत जाणार होता. मात्र, बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास त्याने घरीच गळफास लावून आत्महत्या केली. जयप्रकाश सुरेश ढोके (वय 28, रा. नवीन भानेगाव) असे मृताचे नाव असून, त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप कळू शकले नाही. 

प्राप्त माहितीनुसार, जयप्रकाश हा अविवाहित असून, आई व बहिणींसोबत राहत होता. मागील काही महिन्यांपासून तो पुणे येथे काम करीत होता. आई-बहिणींना भेटण्यासाठी दहा-बारा दिवसांपूर्वी तो भानेगाव येथे आला होता. तो गुरुवारी पुणेला परत जाणार होता. मात्र, बुधवारी जयप्रकाशने घरी कुणीच नसल्याची संधी साधून घरासमोरील हॉलमध्ये लोखंडी पाइपला साडीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.

असे का घडले? - कोणी सांगेल का? माझी काय चूक होती...

जयप्रकाशला आईने आत्महत्या करण्यापूर्वी सिलिंडर आणण्यासाठी पैसे दिले होते. दरम्यान, काही मित्रांसोबत तो खापरखेडा येथे सिलिंडर आणायला गेला होता. मात्र, खाली हात परत आला. याचवेळी जयप्रकाशची आई अवघ्या 10 ते 15 मिनिटांत घरी गेली. तिला समोरचे दार बंद दिसले. तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तिने खिडकीतून आत डोकावून पाहिले असता जयप्रकाश लटकलेल्या अवस्थेत दिसला. 

मुलाचा मृतदेह दिसताच आईने आईने हंबारडा फोडला. शेजाऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली. घटनेची माहिती खापरखेडा पोलिसांना देण्यात आली. लागलीच खापरखेडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह नागपूर येथील मेयो रुग्णालयात पाठविला. फिर्यादी रितेश ढोके (वय 29, रा. नवीन बिना) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास खापरखेड्याचे पोलिस निरीक्षक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत. जयप्रकाशच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. मृत जयप्रकाशला आई व तीन बहिणी असा आप्तपरिवार आहे. त्याच्यावर कोलारघाट भानेगाव येथे अंतिम संस्कार करण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth commit suicide in Nagpur district