वेळ रात्रीची, किरऽऽ अंधार, अचानक श्वान जोरात भुंकल्याने गेला युवकाचा जीव

अनिल कांबळे
Sunday, 22 November 2020

दुचाकीवरून थेट उडी घेतली. त्यामुळे झालेल्या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. मात्र, प्रमोदच्या डोक्याला जबर मार लागला. त्याला उमरेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती आणखी बिघडल्यामुळे प्रमोदला नागपुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, प्रमोदचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

नागपूर : दुचाकीने भरधाव जात असताना अचानक श्वान आडवा आला आणि तो जोरात भुंकला. श्वान चावेल या भीतीने दुचाकी चालविणाऱ्या युवकाने थेट खाली उडी घेतली. यामुळे झालेल्या अपघातात युवकाचा जीव गेला तर मित्र गंभीर जखमी झाला. प्रमोद संभाजी पोटे (३०, रा. तारणा, कुही) असे अपघातात मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे तर आकाश खोकसे असे जखमी युवकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, प्रमोद पोटे आणि त्याचा मित्र २६ ऑक्टोबरला रात्री साडेदहा वाजता दुचाकीने टाटा प्रोजेक्ट लिमिटेड, उमरेड मोहपारड जवळील कापसाच्या जिनिंगजवळून जात होते. दरम्यान एक श्वान धावत दुचाकीच्या दिशेने आला. श्वान जोरात भुंकला आणि प्रमोदच्या अंगावर धावला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे प्रमोद घाबरला.

सविस्तर वाचा - दुर्दैवी! फराळाचे पदार्थ करताना अचानक घरात पसरला धूर आणि क्षणाधार्त संसाराची झाली राखरांगोळी

त्याने दुचाकीवरून थेट उडी घेतली. त्यामुळे झालेल्या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. मात्र, प्रमोदच्या डोक्याला जबर मार लागला. त्याला उमरेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती आणखी बिघडल्यामुळे प्रमोदला नागपुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, प्रमोदचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी हुडकेश्‍वर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

दोघांना चिरडले

ठाणेश्‍वरी कवडुजी पारधी (४५, रा. भवानीनगर, पारडी) या शुक्रवारी रेशन दुकानातून घरी जात होत्या. मानकर वाडी परिसरात बोलेरोने ठाणेश्वरी यांना धडक दिली. बोलेरोने सुमारे दहा फुटअंतरापर्यंत ठाणेश्वरी यांना फरफटत नेले. गंभीर जखमी होऊन ठाणेश्वरी यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पारडी पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. दुसरी घटना, जरीपटक्यातील कडबी चौकात घडली. अज्ञात वाहनाच्या धडकेत सुभाष काशिनाथ खोब्रागडे (वय ५०, रा. शेंदुरजना बाजार, ता. तिवसा) हे जखमी झाले. मेयो हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दोन्ही प्रकरणी पोलिसांनी प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल केला.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth dies in accident in Nagpur