झेंडूला आले सोन्याचे भाव; १५० ते २०० रुपये किलो दराने विक्री

Zendu flower price came to the gold
Zendu flower price came to the gold

नागपूर : दिवाळीनिमित्त झेंडू फुलांना चांगलीच मागणी वाढली आहे. मात्र, अतिवृष्टीचा फटका बसल्याने दर चढेच आहे. शुक्रवारी किरकोळ बाजारात किमान १५० ते २०० रुपये किलो दराने झेंडूची विक्री झाली.

दिवाळी सण व साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या पाडवा सणाला झेंडूच्या फुलांना अनन्यसाधारण महत्त्व असते. पूजेसह घराला तोरण बांधणे, सजावट, वाहनांना; तसेच अन्य महत्त्वाच्या वस्तूंना झेंडूच्या फुलांचे हार घातले जातात. त्यामुळे मागणी लक्षात घेता विक्रीतून चांगली कमाई होईल, या आशेपोटी शेतकऱ्यांनी झेंडूची मोठ्या प्रमाणात लागवड केली.

परंतु, अतिवृष्टीमुळे फुलांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आवक कमी झालेली आहे. त्याचा फायदा झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना होऊ लागला आहे. घाऊक बाजारात झेंडू ७० ते १०० रुपये किलो दराने विकले जात आहे. नेताजी मार्केटच्या घाऊक बाजारात सध्या फुलांची आवक सुरळीत सुरू आहे.

गेल्या महिन्यापासून पाऊस न आल्याने झेंडूचे चांगले उत्पादन झालेले आहे. दसऱ्याला व दिवाळीला फुलाची मागणी वाढल्याने शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने दिवाळी झाली आहे असे फुल विक्रेते जयंत रणनवरे यांनी सांगितले.

दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या विक्रीतही वाढ झालेली आहे. पुरवठा कमी आणि मागणी अधिक असल्याने अनेक वाहनांसाठी प्रतीक्षा यादी आहे. अनेक दिवसानंतर वाहन क्षेत्राला सुगीचे दिवस आले आहे असे आशीष काळे यांनी सांगितले. इलेक्ट्रॉनिक्स बाजारात ग्राहकांची वर्दळ वाढलेली असून अपेक्षेनुसार टीव्ही, फ्रिज, गृहोपयोगी वस्तूची मागणी वाढलेली आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ग्राहक बाजार कमी आले. येत्या काळात व्यवसायात भरारी येईल असे बापट शॉपचे संचालक नागेश बापट यांनी सांगितले. प्रॉपर्टी बाजारात वर्दळ वाढली आहे. ग्राहकांकडून फ्लॅटचे बुकिंग होऊ लागले आहे, असे बांधकाम व्यावसायिक सुंदर रतन यांनी सांगितले.

घाऊक बाजारातील किलोचा दर

फूल किलोमध्ये
झेंडू १००-१२०
शेवंती २५०-३००
गुलाब ३००-४००

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com