ईशान जैन शहरातून अव्वल

ईशान जैन
ईशान जैन

नागपूर : नागपूरसह देशभरातील विविध शहरांमध्ये 2 ते 7 एप्रिल दरम्यान झालेल्या "जेईई मेन्स' कम्प्युटर बेस्ड परीक्षेचा निकाल सोमवारी (ता. 29) रात्री घोषित करण्यात आला. यात नागपुरातील "आयकॅड'च्या ईशान जैन याने देशभरातून 120 वा क्रमांक पटकावित बाजी मारली. तो उपराजधानीतून प्रथम असल्याचा दावा करण्यात आला आहे.
"नेशनल टेस्टिंग एजेंसी'ने(एनटीए) परीक्षेची ऍन्सर की जाहीर केली. त्यामुळे लवकरच "एनटीए' कडून निकालाची घोषणा होणार असल्याचे सुचोवात मिळाले होते. यंदा पहिल्यांदाच एनटीएने दोनदा जेईई मेन्स परीक्षा घेतली होती. जानेवारीमध्ये आयोजित या परीक्षेला 10 लाख 13 हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. एप्रिलमध्ये झालेल्या परीक्षेला 10 लाख 25 हजार विद्यार्थी सहभागी झाले. सोमवारी रात्री उशिरा निकालाची घोषणा करण्यात आली. त्यात आयकॅडच्या ईशान जैन याने 360 पैकी 341 गुणासह देशभरातून 120 रॅंक मिळविले आहे. त्याला 99.9938803 पर्सेंटाईल मिळाले आहेत. त्याने गणितामध्ये शंभर टक्के गुण मिळविले आहे. यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर चिन्मन रत्नपारखीला 342 गुणासह 197 वा रॅंक (99.9877859 पर्सेंटाईल), 335 गुणासह तिसऱ्या क्रमांकावर अथर्व वराडेने (99.9839962 पर्सेंटाईल) 242 वा रॅंक तर इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांत देशभऱ्यातून 27 वा क्रमांक पटकाविला आहे. चौथ्या क्रमांकावर वेदांत साबू (99.9763903 पर्सेंटाईल) याने 341 गुणासह 344 वा रॅंक मिळविला आहे.
आयकॅडचे सारंग उपगल्लावार यांनी चारही विद्यार्थ्यांनी शहरातून टॉप असल्याचा दावा केला आहे. जेईई मेन्समध्ये उत्तीर्ण होणारे विद्यार्थी हे एडव्हान्स परीक्षेसाठी पात्र होणार आहेत. 28 मेला देशातील विविध शहरांमध्ये परीक्षा होणार आहे. दोन सत्रात होणाऱ्या परीक्षेचा पेपर 1 सकाळी 9 ते 12 तर पेपर -2 दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजता या वेळात होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com