जिजाऊ पालखी सोहळ्याने अवतरली शिवशाही

अमरावती ः पालखी सोहळ्यात सहभागी जिजाऊ ब्रिगेडच्या महिला.
अमरावती ः पालखी सोहळ्यात सहभागी जिजाऊ ब्रिगेडच्या महिला.


अमरावती ः ढोलताशांचा गजर, वारकरी मंडळींची शिस्तबद्ध पावली, लेझीम पथक अन्‌ प्रबोधन करणारा बालकलाकार असा रंगारंग सोहळा बघून अवघी शिवशाही अवतरल्याचा भास शुक्रवारी (ता.10) अमरावतीकरांना झाला.
जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने प्रथमच श्रीसंत ज्ञानेश्‍वर सांस्कृतिक भवनात सहावे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने जिजाऊ पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी 4 वाजता राष्ट्रमाता जिजाऊ व संत गाडगेबाबांच्या भेटीसाठी सजवलेल्या पालखीतून मिरवणूक काढण्यात आली.
जिजाऊ तथा शिवधर्म गाथा, अभंग गाथा, ग्रामगीता तसेच भारताचे संविधान हे ग्रंथ पालखी सोहळ्यात होते. जिजाऊ संस्काराच्या मुलींनी ही पालखी उचलली. पालखीच्या मागे जिजाऊ ब्रिगेडच्या महिला सदस्य केसरी साडी व फेटा, या गणवेशात होत्या. मुलेमुली व पुरुष मंडळीही एका ठरलेल्या गणवेशात मार्गक्रमण करताना बघायला मिळाले. श्रीसंत ज्ञानेश्‍वर सभागृह येथे पालखीचा समारोप झाला. यानंतर शिवकालीन सांस्कृतिक कार्यक्रमाने शोभा वाढविली. यासोबतच आर्ट गॅलरी तथा भवनाच्या परिसरात प्रदर्शन लावण्यात आले. हॅण्डलूम, हॅण्डक्राफ्ट, ज्यूटक्राफ्ट, इमिटेशन ज्वेलरी, खादी साडी, महिलांसाठी कूर्ता तथा साजसज्जासाठी लागणाऱ्या साहित्यांचे स्टॉल्स याठिकाणी मांडण्यात आले आहे. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, साहित्यिक, व्यावसायिक, कौटुंबिक, धार्मिक, शेती पर्यावरणासह अनेक विषयांवर चर्चा व परिसंवाद तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाईल. मयूरा देशमुख, कीर्तिमाला चौधरी, सीमा बोके, शीला पाटील, मनाली तायडे, मंजू ठाकरे, जिल्हा संघटक हर्षा ढोक उपस्थित होत्या.

12 ऑगस्टला समारोप

सहाव्या राष्ट्रीय अधिवेशनाचा समारोप 12 ऑगस्टला होईल. अधिवेशनात महिला संबंधी अनेक विषयांवर विचारमंथन होईल. प्रा. डॉ. नीलिमा इंगोले, खासदार नवनीत राणा, आमदार ऍड. यशोमती ठाकूर, नागपूरच्या महापौर नंदा जिचकार, माजी आमदार रेखा खेडेकर, डॉ. शीतल उगले, पोलिस अधीक्षक श्‍वेता खेडेकर, क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख, डॉ. वसुधा बोंडे, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष डॉ. रेखा पाटील, पी. आर. पोटे एज्युकेशन ट्रस्टच्या संचालिका अनुराधा पोटे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सोनाली देशमुख आणि मंजिरी शेखावत कार्यक्रमात उपस्थित राहतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com