सावनेरमध्ये वॉलप्लास्ट कारखाना सुरू करणार

छायाचित्र
छायाचित्र

नागपूर ः सावनेर येथील एमआयडीसी परिसरात होम सोल्युशन ब्रॅण्ड कंपनी वॉलप्लास्ट नवीन कारखाना सुरू करणार आहे. चार एकर परिसरात हा कारखाना आहे. या माध्यमातून विदर्भात कंपनीच्या उत्पादनाची विक्री वाढविण्याची योजना आहे, अशी माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलान ठक्कर यांनी दिली.
पायाभूत सुविधा, संशोधन व विकासाच्या साहाय्याने आपली आगळी-वेगळी ओळख वॉलप्लास्टने निर्माण केली आहे. सध्या विदर्भात सहा हजार मेट्रिक टन कंपनीच्या उत्पादनाची विक्री होत आहे. येत्या तीन वर्षांत तो आकडा 50 हजार मेट्रिक टनवर नेण्याचे उद्दिष्ट आहे. वॉल पुट्टी तयार करणारी ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. ग्राहकांना वाजवी दरात चांगल्या गुणवत्तेचे उत्पादन देण्याचा कंपनीने प्रयत्न केला आहे. पुट्टी, प्लास्टर, ऍडव्हेसिवसह पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात विविध पर्याय बाजारात आणले आहेत. कलर पुट्टी व वॉटरप्रूफ पुट्टी, रेडी मिक्‍स प्लास्टर, स्टाईल एडव्हेसिव्ह, ब्लॉक जॉइनिंग मोटार ही उत्पादने लवकरच विदर्भातील बाजारात आणणार आहे. या सर्वच उत्पादनाची तपासणी आंतरराष्ट्रीय गुणवत्तेनुसार करण्यात आलेली आहे. विद्यमान स्थितीत गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तमिळनाडूत कारखाने असून आता नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे कारखाना सुरू करण्यात येत आहे. या कारखान्यात 50 पेक्षा अधिक युवकांना प्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. यामुळे विदर्भातील उत्पादनाच्या विक्रीत वाढ करण्यात येणार आहे. सिमेंटला पर्याय म्हणून पुट्टीचा वापर करण्यात येत आहे. किरकोळ बाजारात मंदी असली तरी सध्या आम्ही शासकीय यंत्रणांना उत्पादनाचा पुरवठा करण्यावर लक्ष केंद्रित केलेले आहे. जुन्या घरांचे नूतनीकरण कायम सुरू असल्याने व्यवसाय दरवर्षी दहा टक्के वाढत आहे. वॉल पुट्टीची देशातील उलाढाल 7500 कोटी रुपयांची आहे. त्यात सतत वाढ होत असल्याचेही ठक्कर म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com