Dogs attacking piglets

file photo
file photo

टेकाडी  रामटेक अंतर्गत निसतखेडा येथील शेतात हरणाच्या पिलावर काही कुत्र्यांनी हल्ला चढवला. सुदैवाने शेतकऱ्याचे लक्ष गेल्याने हरणाच्या पिलाचे प्राण वाचले. कन्हान येथील प्राणिमित्रांना सूचना देताच त्यांनी हरणाला नागपूर गोरेवाडा वनविभागाच्या स्वाधीन केले. डोंगरदऱ्यातून फिरताना हरणाचे तीन दिवसांचे नवजात पिलू कळपापासून दुरावले. ते फिरत फिरत मंगळवारी निसतखेडा शिवारातील राजू दारोडे यांच्या शेतात पोचले. लहानशा हरणाच्या मागे बेवारस कुत्र्यांनी धाव घेतली. पिलू जिवाच्या आकांताने पळत सुटले. सुदैवाने दारोडे यांचे लक्ष गेल्याने त्यांनी कुत्र्यांना हाकलून लावले व पिलाचे प्राण वाचविले. प्राणिमित्र शेखर बोरकर यांना दारोडे यांनी घडलेला प्रकार सांगितला. माहिती मिळताच शेखर बोरकर आणि नितीन महाजन यांनी निसतखेडा गाठून रामटेक वनविभाग हद्दीअंतर्गत सुरेश राठोड यांना सूचना दिली. संबंधित अधिकाऱ्यांनी येण्यास उशीर केल्याने बोरकर यांनी नागपूर गोरेवाडा वनविभागाला सूचना देऊन कन्हान गाठले. प्राणिमित्रांनी हरणाच्या पिलाला घेऊन थेट नागपूर गाठले. खसाळा नाका येथे वनविभाग आणि प्राणिमित्रांची भेट झाली. हरणाच्या पिलाला सुरक्षित गोरेवाडा रेस्क्‍यू सेंटरच्या स्वाधीन करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com