शरीरसुखाची मागणी करणाऱ्या मॅनेजरला एक दिवसाची पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

खामगाव : पीक कर्ज देण्यासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱ्या मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा शाखाधिकारी राजेश हिवसेला मलकापूर पोलिसांनी सोमवारी रात्री नागपुर येथून अटक केली. त्याला आज (ता. 26) खामगाव न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपी राजेश हिवसे यास एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

खामगाव : पीक कर्ज देण्यासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱ्या मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा शाखाधिकारी राजेश हिवसेला मलकापूर पोलिसांनी सोमवारी रात्री नागपुर येथून अटक केली. त्याला आज (ता. 26) खामगाव न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपी राजेश हिवसे यास एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

मलकापूर तालुक्यातील उमाळी गावातील शेतकरी त्याच्या पत्नीसोबत पीक कर्जासाठी गुरूवारी (ता. 21 जून) सकाळी दाताळा येथील सेंट्रल बँकेत गेला होता. कागदपत्रांची तपासणी करून तुमचा मोबाईल नंबर द्या, अशी सूचना शेतकऱ्याला बँक व्यवस्थापकाने केली होती. त्या अनुषंगाने संबंधित शेतकऱ्याने त्याच्या पत्नीचा मोबाईल नंबर दिला. त्यावर शाखाधिकाऱ्याने अश्लिल संभाषण करून शरीरसुखाची मागणी केली. याप्रकरणी शेतकऱ्याने मलकापूर पोलिसात तक्रार नोंदविली होती.

महिलेच्या तक्रारीवरून सेंट्रल बँकेचे शाखाधिकारी राजेश हिवसे व शिपाई मनोज चव्हाण या दोघांविरोधात अपराध नं. 108 /18 कलम 354 अ, (2), भादंवि, सहकलम 3 (1), (डब्ल्यूू) (1), 3 (1), (डब्ल्यूू) (2) अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे. घटनेनंतर आरोपी बँक व्यवस्थापक राजेश हिवसे व शिपाई मनोज चव्हाण फरार झाला होता. पोलिसांनी शिपायास तीन दिवसापूर्वीच अटक केली आहे. यानंतर सोमवारी रात्री रात्री पोलिसांनी राजेश हिवसेला नागपुर येथून अटक केली. आरोपी हिवसे यास खामगाव येथील सह जिल्हा सत्र न्यायाधिश श्री. जाधव यांच्या न्यायालयात हजर केले असता आरोपीला एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. विवेक बापट यांनी चार दिवसांची पोलिस कोठडीची मागणी केली असता दोन्ही कडील युक्तीवाद ऐकुन न्यायाधिशांनी आरोपीला एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

जिल्हा सत्र न्यायाधिश जाधव यांच्याकडे मलकापूर व खामगाव दोन्ही न्यायालयातील सह न्यायाधिश म्हणून पदभार असल्याने आठ दिवस मलकापूर व आठ दिवस खामगाव न्यायालयात ते काम पाहतात. त्यामुळे आज आरोपीला खामगाव येथील न्यायालयात हजर करण्यात आले.  

Web Title: 1 days police custody to bank manager who demand for physical relation