दहा लाख क्विंटल तूर पडून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

अमरावती - शेतकऱ्यांच्या घरांत अद्याप दहा लाख क्विंटल तूर व हरभरा पडून असण्याची शक्‍यता सरकारी सूत्रांनी वर्तविली. यासंदर्भात मंगळवारी (ता. ५) होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे यंत्रणेचे लक्ष लागून आहे. 

जिल्ह्यात तूरखरेदीसाठी एकूण ७० हजार १९७ शेतकऱ्यांची नोंदणी झालेली होती; पैकी ३३ हजार ५१२ शेतकऱ्यांची ५ लाख ३४ हजार ३७६ क्विंटल तूर खरेदी करून घेण्यात आली. नोंदणी झालेल्यांपैकी अद्याप ३६ हजार ६८५ शेतकऱ्यांची तूर खरेदीअभावी बाकी आहे. 

शेतकऱ्यांच्या घरात पडून असलेली तूर अंदाजे ६ लाख क्विंटल असावी, असा यंत्रणेचा कयास आहे. यासोबतच शासनाकडे हरभरा खरेदीसाठी ३३ हजार ५५५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली; पैकी १० हजार ८०० शेतकऱ्यांकडील १ लाख ७६ हजार ६८३ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला.

अद्याप २२ हजार ७५५ शेतकऱ्यांचा अंदाजे ४ लाख क्विंटल हरभरा खरेदी करणे बाकी आहे. म्हणजेच जिल्ह्यात नोंदणी झालेल्यांपैकी ५९ हजार ४४० शेतकऱ्यांकडील अंदाजे ६ लाख क्विंटल तूर व ४ लाख क्विंटल हरभरा, अशी एकूण १० लाख क्विंटल कडधान्याची खरेदी बाकी आहे. तूर व हरभरा खरेदीसाठी शेतकऱ्यांकडून शासनावर दबाव वाढत आहे.

गोदामांची अपुरी संख्या
गोदामांची अपुरी संख्या आणि बारदाण्याचा प्रश्‍न यंत्रणेला सतावत आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांकडील तूर व हरभरा खरेदी करण्याच्या भानगडीत न पडता तूर व हरभऱ्याचे हमीभाव आणि बाजारभाव यांतील तफावतीची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात होत आहे. या मागणीवर मंत्रिमंडळ बैठकीत सकारात्मक निर्णय येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

Web Title: 10 lakh quintal turdal