दहा वर्षीय मुलीवर बलात्कार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

नागपूर - पाचव्या वर्गात शिकत असलेल्या दहा वर्षीय मुलीवर शेजाऱ्यानेच बलात्कार केल्याची घटना नंदनवन पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. मनोज जनार्दन भिसे (45) असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. मुलीचे आईवडील मजुरीचे काम करतात. दिवसभर ते बाहेर असल्याने मुलगी आजीसोबत राहत होती. आरोपी हा पीओपीचे काम करतो. तो विवाहित असून, दोन मुले आहेत. दिवाळीत मुलगी आरोपीच्या मुलीसोबत खेळायला त्याच्या घरी गेली होती. त्या वेळी त्याने मुलीशी अश्‍लील चाळे करीत लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली.

नागपूर - पाचव्या वर्गात शिकत असलेल्या दहा वर्षीय मुलीवर शेजाऱ्यानेच बलात्कार केल्याची घटना नंदनवन पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. मनोज जनार्दन भिसे (45) असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. मुलीचे आईवडील मजुरीचे काम करतात. दिवसभर ते बाहेर असल्याने मुलगी आजीसोबत राहत होती. आरोपी हा पीओपीचे काम करतो. तो विवाहित असून, दोन मुले आहेत. दिवाळीत मुलगी आरोपीच्या मुलीसोबत खेळायला त्याच्या घरी गेली होती. त्या वेळी त्याने मुलीशी अश्‍लील चाळे करीत लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पुन्हा रामनवमीच्या दिवशी घरी कुणी नसल्याची संधी साधून अत्याचार केला. 10 एप्रिलला पुन्हा त्याने तिला घरी बोलवले व अश्‍लील चित्रफीत दाखवू लागला. आरोपी पुन्हा लैंगिक अत्याचार करणार म्हणून ती पळून गेली. तिने आजीला सर्व हकिगत सांगितली. आजीने तिच्या आईवडिलांना सांगितले. त्यानंतर त्यांनी नंदनवन पोलिस ठाण्यात तक्रार दिली. 

Web Title: 10-year-old girl raped