१० कोटींचा घोटाळा

केवल जीवनतारे
गुरुवार, 5 जुलै 2018

नागपूर - सार्वजनिक आरोग्य विभागात औषध खरेदीत घोटाळा होत असल्याचे अनेक प्रकार पुढे आले आहेत. प्रादेशिक मनोरुग्णालयात एका कर्मचाऱ्याला औषध वितरणात पावतीमधील गैरव्यवहारात निलंबित करण्यात आले. मात्र, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य लेखाशीर्षांतर्गत लेखा परीक्षणात कंत्राटी कर्मचाऱ्यांना महिन्याचे वेतन एकदा नव्हेतर दुबार अदा करताना सुमारे १० कोटींवर रकमेचा गैरप्रकार झाल्याची माहिती पुढे आली असताना एकाही कर्मचाऱ्याला या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले ले नाही. या प्रकरणात दोषींना वाचविण्याचा प्रकार सार्वजनिक आरोग्य विभागात सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. 

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये चंद्रपूर येथील नासीर ट्रेडर्स, आधार स्वच्छता सेवा सहकारी संस्था, साई बहुउद्देशीय विकास  संस्था यांच्यामार्फत अवैद्यकीय कंत्राटी सेवा आरोग्य विभागाकडून २०१४-१५ ते २०१७-१८ या कालावधीमध्ये घेतली आहे. या कालावधीत अदा करण्यात आलेल्या वेतनाची देयके, उपप्रमाणके, कार्य आदेशाशिवाय इतर दस्तऐवजाचे ऑडिट नागपूर महालेखाकार विभाग यांच्याकडून तपासण्यात आले. यावर आक्षेप नोंदविण्यात आला. याशिवाय खातेनिहाय लेखापरीक्षण पुणेमार्फतही अंकेक्षण करण्यात आले असून लेखाक्षेप घेण्यात आले आहेत. 

या चार वर्षांच्या कालावधीत १० कोटी २ लाख ५२ हजार ९२८ रुपयांचा अपहार झाला  आणि ३ कोटी ९९ लाख १८हजार ३०९ रुपयांची अनियमितता आढळून आल्याचे गोपनीय पत्र २१ एप्रिल रोजी आरोग्यसेवा विभागाचे आयुक्त तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानचे संचालक यांना नागपूरचे आरोग्य उपसंचालक डॉ. एस. के. जायस्वाल यांनी पाठविले आहे. 

चंद्रपूर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पी. एम. सोनुने, डॉ. पी. एम. मुरंबीकर, डॉ. यु. बी. नावाडे, डॉ. टी. जी. धोटे, डॉ. यु. व्ही. मुनघाटे, मुख्य प्रशासकीय अधिकारी एस. ई. कांडेकर, प्रभारी प्रशासकीय अधिकारी एस. एन. वांदिले, प्रशासकीय अधिकारी-रोखपाल सी. आर. ठाकरे, भांडारपाल एन. तुराणकर, औषध निर्माण अधिकारी विवेक माणिक यांच्यावर अद्याप कारवाई नाही. यासंदर्भातील चौकशी अहवाल व विवरण पत्रे आरोग्य सेवा विभागातील आयुक्तांना सादर केली आहेत.

अधिकाऱ्यांची बदली
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी अदा करण्यात आलेले दुबार देयकाचे प्रकरण उजेडात आले. यानंतर काही दिवसांपूर्वी येथील जिल्हा शल्यचिकित्सक यांची बदली झाली. प्रशासकीय अधिकाऱ्यांची बदली मात्र नागपूर येथील आरोग्य उपसंचालक कार्यालयात झाली, असा प्रकार पुढे आला आहे.

Web Title: 100 Crore rupees scam in Public Health Department