esakal | शिदोडीतील १०० ग्रामस्थांना डायरियाची लागण
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

 परिस्थिती सध्यातरी नियंत्रणात आली आहे. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी कोणाची? हा प्रश्‍न निर्माण झाला असला तरी सध्या मात्र गावातील जवळपास १०० रुग्ण डायरियासदृश साथीने बाधित झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

शिदोडीतील १०० ग्रामस्थांना डायरियाची लागण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धामणगावरेल्वे(अमरावती) : तालुक्‍यातील शिदोडी गावात दूषित पाण्याचा पुरवठा झाल्याने २४ तासांत जवळपास १०० च्या जवळपास लोकांना डायरियासदृश रोगाची लागण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान आरोग्य प्रशासन आरोग्यसेवा पुरविण्याचा प्रयत्न करीत असूनही डायरिया बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

ब्रेकिंग : ज्योतिरादित्य सिंधियांनी घेतले स्मृती मंदिरात दर्शन; सिंधिया पहिल्यांदाच नागपूर दौऱ्यावर

धामणगावरेल्वे तालुक्‍यातील मंगरूळदस्तगीर नजीक असलेल्या शिदोडी या गावाला ताराराणी संस्थान परिसर व गावातील विहिरीवरून पाणीपुरवठा होतो. दरम्यान पावसाने झालेल्या अस्वच्छतेमुळे गावातील नागरिकांना सदोष पाणीपुरवठा झाल्याने काल गावातील दहा ते बारा लोकांना उलटी व संडासचा त्रास सुरू झाला, त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू असतानाच मंगळवारी (ता. २५) संपूर्ण गावात संडास, उलटी, मळमळ यासारख्या लक्षणांच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. गावात आज एकाच दिवशी ६० ते ७० रुग्णांना डायरियासदृश रोगाची लक्षणे आढळून आल्याने आरोग्य प्रशासन हादरून गेले आहे. दरम्यान तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्‍टर हर्षल क्षीरसागर यांच्यासह प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या चमूने तात्काळ शिदोडी गावात धाव घेऊन आरोग्यसेवा पुरवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे  परिस्थिती सध्यातरी नियंत्रणात आली आहे. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी कोणाची? हा प्रश्‍न निर्माण झाला असला तरी सध्या मात्र गावातील जवळपास १०० रुग्ण डायरियासदृश साथीने बाधित झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

प्रशासनाने घेतले तडकाफडकी ब्लिचिंग 
पावसाळा आला की गावाची सर्वांगीण आरोग्य व्यवस्था सांभाळणे, विहिरीत ब्लिचिंग टाकणे, अशा इतर उपाययोजना केल्या जातात. अशा कोणत्याच उपाययोजना न करता आता एकाच दिवशी शंभरच्यावर डायरियासदृश रुग्ण शिदोडी गावात आढळल्याने प्रशासनाच्या उपाययोजनांची पोलखोल झाली. रुग्ण आढळल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने आज ब्लिचिंगची खरेदी केली. आता प्रशासनाने साप गेल्यानंतर लाठी मारण्याचा प्रकार सुरू केला असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
 
परिस्थिती नियंत्रणात 
गावाबाहेर आणि गावातील दोन विहिरींतून गावाला पाणीपुरवठा होतो. विंधन विहिरीच्या बाजूला दूषित पाणी साचले असल्याचे केलेल्या तपासणीत आढळून आले आहे. गावातील सर्व रुग्णांची प्राथमिक तपासणी केली असून, परिसरात प्राथमिक उपचार केंद्र तसेच आयसोलेशन वॉर्ड तयार केला आहे. तर दुसरीकडे समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्यसेवक यांच्यासह संपूर्ण वैद्यकीय चमू सज्ज ठेवण्यात आली. तथापि, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्‍टर हर्षल क्षीरसागर यांनी सांगितले. दरम्यान उद्या सर्व रुग्णांचे रक्ताचे नमुने व शौचाचे नमुने घेण्यात येऊन त्याची तपासणी करण्यात येणार आहे. नागरिकांनी पाणी उकळून प्यावे व घरगुती शौचालयाचा वापर करावा, असे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांची आरोग्यतपासणी
शिदोरी येथील नागरिकांची वैद्यकीय तपासणी आरोग्य पथकाने केली असून गावात आरोग्य पथक तळ ठोकून आहे. दरम्यान अमरावती येथील जिल्हा साथरोग पर्यवेक्षीय अधिकारी प्रिया सिंग, तालुका आरोग्य अधिकारी हर्षल क्षीरसागर, गटविकास अधिकारी पंकज भोयर, पंचायत विस्तार अधिकारी मिलिंद ठुनुकले यांच्यासह आदींनी भेट दिली.

-संपादन ः चंद्रशेखर महाजन

loading image
go to top