दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांवर नापासचा शिक्का नाही!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

अकाेला : सध्या दहावीच्या मुलांमध्ये निकालाचं टेन्शन आहे. काेणी पास तर काेणी नापास हाेईल. मात्र, यंदा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांवर नापासचा शिक्का बसणार नाही. अशा विद्यार्थ्यांना सहा महिन्यांचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. शिवाय, पुरवणी परीक्षेच्या सहाय्याने त्यांना उत्तीर्ण हाेण्याची संधी असेल.

अकाेला : सध्या दहावीच्या मुलांमध्ये निकालाचं टेन्शन आहे. काेणी पास तर काेणी नापास हाेईल. मात्र, यंदा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांवर नापासचा शिक्का बसणार नाही. अशा विद्यार्थ्यांना सहा महिन्यांचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. शिवाय, पुरवणी परीक्षेच्या सहाय्याने त्यांना उत्तीर्ण हाेण्याची संधी असेल.

दहावी नापास झालेल्या विद्यार्थी व पालकांचे शाळेतच समुपदेशन केले जाईल. त्यानंतर या विद्यार्थ्यांना सहा महिने कालावधीचे राेजगाराभीमुख कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थी दहावीच्या पुरवणी परीक्षेला देखील बसू शकतील. याच दरम्यान एटीकेटीच्या माध्यमातून अशा विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया न जाता त्यांना कौशल्याचे धडे घेण्याची संधी उपलब्ध हाेणार आहे.

आधी शिक्षकांचे समुपदेशन
जिल्ह्यातील दहावीचे निकाल एका केंद्रावरून वितरीत केले जातात. येथे शाळेचा निकाल घेण्यासाठी आलेल्या शिक्षकांना बाेर्डाच्या प्रतिनिधीकडून समुपदेशन केले जाईल. त्यानंतर हे शिक्षक नापास विद्यार्थी व त्यांच्या पालकांना समुपदेशन करणार आहेत.

पालकांची भूमिका महत्त्वाची
विद्यार्थी नापास झाला की, पालक त्यांना दाेष देतात. विद्यार्थी पास झाला, तरी अनेक पालक त्याला टक्केवारीच्या काेंडीत पकडतात. अशा परिस्थितीत पालकांनी विद्यार्थ्यांना धीर देण्याची गरज असते. त्यामुळे पाल्यांना सावरून त्यांना याेग्य दिशा देणारी पालकांची भूमिका महत्त्वाची आहे.

पुरवणी परीक्षा जुलैमध्ये
दहावीची पुरवणी परीक्षा जुलैमध्ये हाेणार आहे. कौशल्य शिक्षणाच्या कालावधीतच ही पुरवणी परीक्षा आटपून विद्यार्थ्यांचा नवा निकालही जाहीर हाेईल.

कुठल्याच विद्यार्थ्यांना नापास म्हणता येणार नाही. अशा विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षणाची संधी आहे. पालकांनी याकडे सकारात्मक दृष्टीने बघावे.
- प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी, माध्यमिक

Web Title: on 10th fail student not no title of fail