11 हजार प्राध्यापकांची पदभरती होणार

file photo
file photo

नागपूर: विद्यापीठ अनुदान आयोगाने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली असून त्यानुसार सहा महिन्यांच्या आत प्राध्यापकांची रिक्त पदे भरावी लागणार आहे. तसे आदेशही आयोगाने काढले असून महाराष्ट्रातील सुमारे 11 हजार सहाय्यक शिक्षकांची पदे भरली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहेत.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे घेण्यात आलेल्या एका बैठकीत देशभरातील कॉलेज प्राध्यापकांच्या रिक्त पदांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांना रोजगार देण्याच्या केलेल्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाने ही मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. येत्या सहा महिन्यांत ही पदे भरावीत, अशी सूचनाही देशभरातील विद्यापीठांच्या कुलगुरूंना पत्र लिहून केली आहे.
देशातील शिक्षणात आमूलाग्र बदल करू पाहणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा नुकताच जाहीर झाला आहे. यात कौशल्यावर विशेष भर देण्यात आला आहे. तसेच शिक्षणाचे नवे विषय आणि पर्यायही खुले करण्यात आले आहेत. या सर्वांची अंमलबजावणी करीत असताना वर्गात उत्तम शिक्षक असणे अपेक्षित आहे. अनेक महाविद्यालयांत शिक्षकांच्या अभावामुळे शैक्षणिक दर्जा घसरत असल्याने देशभरात आंदोलने होत होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com