तारतंत्री बेरोजगारांकरिता अनुभवअटची आडकाठी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

महावितरणची पदभरती - विभागात दोन हजार 542 जागांची भरती; शासनाने लक्ष द्यावे
कारंजा (जि. वर्धा) - चंद्रपूर, कोराडी येथील औष्णिक महावीज निर्मिती कंपनीमध्ये तारतंत्री अनुभवी उमेदवारांना एक वर्षाचेच अनुभव प्रमाणपत्र मिळत असल्यामुळे महावितरणच्या पदभरतीपासून शेकडो उमेदवार वंचित राहणार आहेत. या पदभरतीकरिता शासनाने दोन वर्षांचा अनुभव बंधनकारक केल्यामुळे उमेदवार अडचणीत आले आहेत.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यकक्षेत येणाऱ्या उपकेंद्राकरिता उपकेंद्र सहायक पदे सरळ सेवा भरतीद्वारे तीन वर्षांच्या कंत्राटी कालावधीकरिता 2 हजार 542 पदे वीजतंत्री/तारतंत्री यामधून भरण्यात येणार आहेत. यासाठी या व्यवसायातील अथवा इलेक्‍ट्रिकल सेक्‍टरमध्ये उमेदवारांना दोन वर्षांचे अनुभव प्रमाणपत्र प्राप्त करून संबंधित विभागाला द्यावे लागणार आहे. मात्र महावितरण/महापारेषणमध्ये शिकाऊ उमेदवारांना दोन वर्ष प्रशिक्षण कालावधीचे प्रमाणपत्र दिले जाते. शेकडो उमेदवारांनी तारतंत्री म्हणून महानिर्मिती कोराडी आणि चंद्रपूर येथे प्रशिक्षण घेतले असेल अशा उमेदवारांना एक वर्षाचे अनुभव प्रमाणपत्र दिले जाते. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बेरोजगार युवकांकरिता जागा भरतीचा मोठा गाजावाजा केला; मात्र त्यांच्याच मतदारसंघामधील कोराडी महानिर्मिती प्रकल्पात तारतंत्री उमेदवार म्हणून प्रशिक्षण घेतलेल्यांना पात्रताच पूर्ण करता येणार नाही. हा अन्याय असल्याचे बेरोजगार युवकांचे म्हणणे आहे.

ऊर्जामंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी
महावितरण विभागात दोन हजार 542 जागा भरती करीत असल्याने त्यात रिक्त पदांचा गोषवारा अनुसूचित जाती 244, अनुसूचित जमाती 281, विमुक्त जाती (अ)93, भटक्‍या जमाती (ब) 38, भटक्‍या जमाती (क) 68, भटक्‍या जमाती (ड) 51, विशेष मागास प्रवर्ग 29, इतर मागासवर्गीय 360, खुला प्रवर्ग 1378 अशा एकूण 2542 जागा भरल्या जाणार आहेत. ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी आम्हाला दोन वर्षांचे अनुभव प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी तारतंत्री उमेदवारांनी केली आहे.