लोकसभेच्या तुलनेत भाजपला 12 टक्‍क्‍यांचा फटका 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

नागपूर - लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या मतांपेक्षा महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला तब्बल 12 टक्के मते कमी मिळाली आहेत. महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसची एकूण कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली तरी मतांच्या टक्केवारीत मात्र कॉंग्रेसला काहीसा दिलासा मिळाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. 

गेल्या लोकसभा (2014) निवडणुकीत भाजपचे नितीन गडकरी 2 लाख 85 हजार मताधिक्‍यांनी विजयी झाले होते. लोकसभा निवडणुकीत नागपुरात 10 लाख 85 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीत गडकरी यांना 5 लाख 87 हजार 767 मते मिळाली होती. ही टक्केवारी 54.17 टक्के एवढी येते. कॉंग्रेसचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांना 3 लाख 2 हजार 939 मते मिळाली होती. ही टक्केवारी 27.92 टक्के एवढी येते. विजयी व पराभूत उमेदवारांच्या टक्केवारीमध्येच 27 टक्‍क्‍यांचा फरक होता. 

जवळपास तीन वर्षांनी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला 4 लाख 78 हजार 609 मते मिळाली आहेत. एकूण मतदानाच्या ही टक्केवारी 42.55 एवढी येते. तर कॉंग्रेसला या निवडणुकीत 3 लाख 76 हजार 894 मते मिळाली आहेत. ही टक्केवारी 33.51 एवढी येते. लोकसभा निवडणुकीपेक्षा महापालिका निवडणुकीत भाजपला 1 लाख 9 हजार मते कमी मिळाली आहेत तर कॉंग्रेसला या निवडणुकीत 3 लाख 76 हजार 894 मते मिळाली आहेत. ही टक्केवारी 33.51 एवढी येते. याचा अर्थ लोकसभा निवडणुकीपेक्षा महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसला 74 हजार मते अधिक मिळाल्याचे स्पष्ट होते. लोकसभा निवडणुकीपेक्षा कॉंग्रेसला साडेपाच टक्के अधिक मतदान झाल्याचे स्पष्ट होते. 

Web Title: 12 per cent of the affected