पूर्व विदर्भात डायरियाचे 12 हजार रुग्ण 

पूर्व विदर्भात डायरियाचे 12 हजार रुग्ण 

नागपूर - पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वर्धा या सहा जिल्ह्यांमध्ये डायरियाचे तब्बल 12 हजार रुग्ण आढळून आले आहेत. विशेष असे की, अवघ्या एप्रिल महिन्यात विभागात तीन हजार 600 जणांना डायरिया (अतिसार किंवा हगवणी)च्या त्रासामुळे त्यांना रुग्णालयात भरती करावे लागले आहे. अशा नोंद सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुणे कार्यालयात आहे. 

उन्हाळ्यात डायरिया, ग्रॅस्ट्रो तसेच पाण्यातून होणाऱ्या आजारांमध्ये वाढ होते. मात्र, यावेळी एप्रिल महिन्यात साडेतीन हजार  डायरियाग्रस्तांची नोंद झाल्याने आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहेत. वातावरणातील होणाऱ्या बदलामुळे तसेच दूषित पाण्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होतो. विशेष असे की, खानपानातील बदलही यास कारणीभूत ठरतात. यामुळेच अतिसारासह हागवणीचा त्रास जाणवतो. जानेवारी ते एप्रिल 2019 या कालावधीत नागपूर विभागातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वर्धा या सहा जिल्ह्यांत 11 हजार 700 पेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. सर्वाधिक 9 हजारांवर रुग्ण गडचिरोलीतील आहेत. 

नागपूर शहरात केवळ 5 रुग्ण 
नागपूर शहराचे आरोग्य टिकवण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. परंतु, जनतेच्या आरोग्याबाबत महापालिकेचा आरोग्य विभाग गंभीर नाही. यामुळेच डायरियाच्या (अतिसार किंवा हगवण)च्या अवघ्या 5 रुग्णांची नोंद आहे. ग्रामीण भागातही डायरियाचे रुग्ण नसल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले. आरोग्य विभाग आणि महापालिका यांच्यात समन्वय नसल्याचे माहिती पुढे येत नसल्याची जोरदार चर्चा येथे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com