सव्वा लाख अकोलेकर बनले ‘सायबर दोस्त’

twitter-cyber
twitter-cyber

अकोला  : केंद्र सरकारने ट्विटरवर ‘सायबर दोस्त’ या नावाने एक खाते सुरू केले आहे. सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्यासाठी हे खाते सुरू करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाच्या सायबर क्राईम या विभागाद्वारे हे खाते हाताळले जात आहे. नागरिकांनी या खात्याला फॉलो करून त्याद्वारे सायबर गुन्ह्यांमधील नव्या ट्रेण्डबाबत माहिती घेऊन जागृत व्हावे, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले होते. या खात्याला तब्बल सव्वा लाख अकोलेकरांनी फॉलो केले असून, मोठ्या प्रमाणात अकोलेकर ‘सायबर दोस्त’ होत असल्याची माहिती समोर येत आहे.

सायबर क्राईमचे वाढते प्रमाण लक्षात घेता गृहखात्याने सायबर क्राईमपासून सर्वसामान्य नागरिकांचा बचाव करण्यासाठी ‘सायबर दोस्त’ नावाचे ट्विटरवर अकाऊंट सुरू करण्यात आले. केंद्राकडून राज्यातील सर्वच सायबर पोलिस स्टेशनला 12 नोव्हेंबर 2018 रोजी पत्र देऊन याबाबत जनजागृती करण्याचे आदेश निर्गमीत केले होते. तेव्हा जिल्ह्यातही याबाबत जनजागृती केली जात आहे. सायबर दोस्त नावाचे ट्विटरवरील अकाऊंट फॉलो करून तुम्हाला सायबर गुन्ह्यामधील नव्या ट्रेंडबाबत माहीती मिळणार असून, यातून तुमचा बचाव होणार असल्याची माहिती सायबर विभागाने दिली आहे.

सायबर गुन्ह्याच्या बाबतीत अधिक माहीती करून देण्यासाठी केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाच्या सायबर क्राईम या विभागाद्वारे ट्विटरवर ‘सायबर दोस्त’ नावाचे खाते सुरू केले आहे. हे खाते फॉलो केल्यानंतर सायबरमधील नवीन ट्रेंडबाबत माहीती मिळणार आहे.

याकडे लक्ष देण्याची गरज
कोणत्याही अनोळखी व्यक्ती किंवा कंपनीकडून आलेल्या ई-मेलवर क्लिक करू नका, डेटा सुरक्षीत ठेवण्यासाठी उच्च प्रतिचा अॅंटी व्हायरसचा वापर करा, पासवर्ड वेळोवेळी बदला, सर्वच अकाऊंटसाठी एकच पासवर्ड ठेऊ नका, बॅंके संदभाईतील किंवा इतर माहिती मोबाईलवर सेव्ह करू नका, अनोळकी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारू नका, अनोळखी व्यक्तीने मोबाईवर पाठवलेली कोणतीही लिंक उघडू नका, https ने सुरूवात होणाऱ्या सुरक्षित संकेतस्थळाचाच वापर करा, अकाऊंट आठवणीने लॉगआऊट करा, बॅंकेचे खाते, एटीएम, डेबीट कार्ड, आणि ओटीपी कोणालाही सांगू नका, कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका, धार्मिक भावना भडकवणारे संदेश पाठवू नका, फसवणूक किंवा गुन्हा घडल्यास तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधा.

केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाच्या सायबर क्राईम या विभागाद्वारे ‘सायबर दोस्त’नावाचे ट्विटरवर अकाऊंट सुरू करण्यात आले आहे. हे अकाऊंट फॉलो करून तुम्हाला सायबर गुन्ह्याबाबत माहिती मिळणार आ. हे खाते हाताळण्याबाबत लवकरच माहीती देण्यात येणार आहे.
- शैलेंद्र ठाकरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com