129 महाविद्यालयांतील अभ्यासक्रम बंद 

129 महाविद्यालयांतील अभ्यासक्रम बंद 

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आगामी नव्या शैक्षणिक सत्रात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमातील 129 महाविद्यालयांतील विविध अभ्यासक्रमांना प्रवेशबंदी केली आहे. या महाविद्यालयांच्या यादीसह बंद करण्यात आलेल्या अभ्यासक्रमांची यादीच विद्यापीठाने संकेतस्थळावर टाकली आहे. त्यामुळे ऐन प्रवेशावेळी या महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रमांसाठी नियमित शिक्षक व अन्य सुविधा नसल्याच्या कारणाने हे अभ्यासक्रम बंद करण्यात आल्याचे समजते. 

मागील काही दिवसांआधी 300 हून अधिक महाविद्यालयांमध्ये शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांना संलग्नता देण्यासाठी स्थानिक चौकशी समिती (एलईसी) पाठविण्यात आली होती. समितीच्या निरीक्षणामध्ये महाविद्यालयांमध्ये आवश्‍यक सुविधा दिसून आल्या. ज्यामुळे या महाविद्यालयांना पुढील शैक्षणिक वर्षाकरिता संलग्नीकरण देण्यात आले. मात्र, या निरीक्षणामध्ये 150 महाविद्यालयांमध्ये सुविधा नसल्याचे दिसून आले. अनेक महाविद्यालयांमध्ये नियमित प्राध्यापकही नव्हते. त्यामुळे विद्यापीठाने या महाविद्यालयांना आपल्या त्रुटी पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, यातील 129 महाविद्यालयातील काही अभ्यासक्रमांसाठी विविध सुविधा उपलब्ध न करून दिल्याने ते अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. 

अशी आहे प्रक्रिया 
विद्यापीठाअनुसार देण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार महाविद्यालयांना विविध अभ्यासक्रमांसाठी निर्धारित वेळेत संलग्नीकरणाचे नूतनीकरण करणे आवश्‍यक असते. हे नूतनीकरण 31 ऑगस्टपर्यंत आवश्‍यक असून वाढीव शुल्कासह 30 सप्टेंपर्यंत अर्ज करण्याची मुभा असते. त्यानंतर स्थानिक तपास समितीकडून 15 ते 16 जानेवारी या दरम्यान निरीक्षण केले जाते. त्यानंतर 15 मार्चपर्यंत विद्यापीठाच्या विद्वत परिषदेमध्ये संलग्नीकरणाचा निर्णय घेतला जातो. त्यानंतर 30 एप्रिलपर्यंत सर्व प्रकारचा तपास करून अयोग्य असणाऱ्या महाविद्यालयांचे अभ्यासक्रम बंद करण्यात येतात. 

अशी आहे स्थिती 
नागपूर विद्यापीठामध्ये सध्या 591 महाविद्यालयांचे संलग्नीकरण आहे. ज्यामध्ये 150 महाविद्यालयांना आधीच संलग्नीकरण मिळालेले आहे. महाविद्यालयाचे विद्यापीठाने नुकतेच निरीक्षण केले. उर्वरित 100 महाविद्यालय बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे त्यांची संलग्नीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. त्यात आता अभ्यासक्रमांना बंद करण्याचा निर्णयही विद्यापीठाने घेतला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com