बुलडाण्यातील मलकापूरजवळ भीषण अपघात, 13 जण ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मे 2019

मलकापूर (बुलडाणा) : भरधाव कंटेनर व प्रवासी वाहनाची धडक दिल्याने 13 जण ठार झाल्याची झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर मलकापूर नजीक घडली. आज दुपारी तीन सुमारास हा अपघात झाला असून या अपघातामध्ये टाटा मजिक वाहनातील 13 जण जागीच ठार झाले असल्याची माहिती आहे.  

मलकापूर (बुलडाणा) : भरधाव कंटेनर व प्रवासी वाहनाची धडक दिल्याने 13 जण ठार झाल्याची झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर मलकापूर नजीक घडली. आज दुपारी तीन सुमारास हा अपघात झाला असून या अपघातामध्ये टाटा मजिक वाहनातील 13 जण जागीच ठार झाले असल्याची माहिती आहे.  

मलकापूर नॅशनल हायवे 6 वर रसोय कंपनी जवळकंटेनर आणि टाटा मॅजिकचा भीषण अपघात झाला आहे.सोमवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये चारचाकी वाहनातील 13 जण जागीच ठार झाले  आहे. गाडीमध्ये 13 प्रवासी होते. अशी माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे.   सर्व 13 जणांनानी अपघातामध्ये आपले प्राण गमावले असल्याची भीती आहे. हायवेवर अपघात झाल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

स्थानिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. रस्त्याच्यामध्ये असलेली अपघाती वाहनं बाजूला करण्याचं काम पोलिसांकडून करण्यात येत आहे.

मुकुंद ढगे (वय 40 रा. अनुराबाद), छाया गजानन खडसे (वय 37, रा.अनुराबाद), अशोक लहु फिरके (वय 55, रा.अनुराबाद), नथ्थु वामन चौधरी (वय 45 रा.अनुराबाद), आरती, रेखा, सोयीबाई छगन शिवरकर (वय 29 रा.नागझरी बहाणपूर), विरेन ब्रिजलाल मिळवतकर (वय 7, रा.नागझरी बहाणपूर), सतीष छागन शिवरकर (वय 3), मीनाबाई बिलोरकर, किसन सुखदेव बोराडे (रा.अनुराबाद), प्रकाश भारंबे (रा.जामनेर रोड भुसावळ), मेघा प्रकाश भारंबे असे 13 जण जागीच ठार, तर गोकुल भालचंद्र भिलवसकर (वय 30, रा.नागझरी जि.बहाणपूर), छगन राजू शिवरकर (वय 26, रा.नागझरी जि.बहाणपूर) हे जखमी झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 13 dies in accident near Malakapur Buldana