राज्यातील 9 जिल्ह्यांत 13 सिंथेटिक ट्रॅक

संतोष ताकपिरे
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

अमरावती : ऍथलेटिक्‍समध्ये चांगले खेळाडू तयार व्हावे यासाठी शासनाच्या योजना व कोट्यवधींचे बजेट आहे. परंतु जागतिक दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी ज्या सुविधा हव्यात, त्या फार कमी जिल्ह्यात मिळतात, ही वास्तविकता आहे. राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये फक्त 13 सिंथेटिक ट्रॅक आहेत. त्यातही दोन खासगी असून, 13 पैकी मुंबई व पुणे मिळून सात सिंथेटिक ट्रॅक आहेत.

प्रत्येक जिल्ह्यातून दर्जेदार ऍथलेटिक्‍स खेळाडू निर्माण व्हावे म्हणून सकारात्मक विचार कधी होईल? हा प्रश्‍न उदयोन्मुख खेळाडूंना पडला आहे. जवळपास पंचवीस जिल्ह्यांमध्ये मातीच्याच ट्रॅकवर ऍथलेटिक्‍स खेळाडूंना सराव करावा लागतो. अमरावती विभागाचे ठिकाण आहे. जिल्ह्यातील एका खेळाडूने राज्यस्तरीय (धाव स्पर्धेत) सुवर्ण पदक मिळविले. पुढे तो पोलिस दलात शिपाई म्हणून रुजू झाला. आज तो सहायक पोलिस निरीक्षक पदावर पोहोचला. त्याच्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू होण्याची पात्रता होती. परंतु सुविधेअभावी खेळाडू म्हणून त्याची प्रगती खुंटली. दुसरा असाच एक उदयोन्मुख खेळाडू जो लांब उडी आणि शंभर मीटर धावण्यात चांगली कामगिरी करीत आहे. त्याच्याही मार्गात असेच अडथळे येतात. यापूर्वी मुंबई, पुण्यात सरावासाठी गेलेल्या ऍथलेटिक्‍स खेळाडूंवर आर्थिक विवंचनेमुळे गावाकडे परतण्याची वेळ आली.
नागपूर : विभागीय क्रीडासंकुल
चंद्रपूर : बल्लारशा तालुका क्रीडासंकुल
यवतमाळ : जिल्हा क्रीडा कार्यालय
पुणे : अ)शिवछत्रपती क्रीडापीठ, बालेवाडी
ब)पुणे महानगरपालिका
क)पिंपरीचिंचवड महापालिका
ड)आर्मी स्पोर्टस ग्रुप
कोल्हापूर : 1) विद्यापीठ
रत्नागिरी : खासगी
मुंबई शहर : अ) प्रियदर्शनी (खासगी)
मुंबई ः विद्यापीठ
मुंबई उपनगर ः साई ट्रेनिंग सेंटर कांदीवली
नाशिक : विभागीय संकुल
औरंगाबाद : मंजूर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 13 synthetic tracks in 9 districts of the state