कर्मचारी. मुडाणा येथे 13 जुगाऱ्यांना अटक

मुडाणा : जुगार अड्ड्यावरून वाहने ट्रॅक्‍टरमध्ये टाकताना कर्मचारी.
मुडाणा : जुगार अड्ड्यावरून वाहने ट्रॅक्‍टरमध्ये टाकताना कर्मचारी.

महागाव (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील मुडाणा ते वडद रस्त्यावरील एका शेतातील नाल्याच्या काठावर सुरू असलेल्या जुगारावर यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. त्यात जुगार खेळणाऱ्या 13 जणांना अटक करण्यात आली, तर अनेक जुगारी पळून गेले. शनिवारी (ता. 13) दुपारी तीनच्या सुमारास झालेल्या या कारवाईत जुगारींची 19 वाहने व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला
मुडाणा येथे जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर यवतमाळच्या पोलिसांनी हा छापा टाकला. त्यात जुगार खेळावयास आलेल्या जुगाऱ्यांच्या एकूण 19 दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल्या. मुडाणा येथे जुगार अड्डा सुरू असल्याच्या तक्रारी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयापर्यंत पोहोचल्या होत्या. उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे पथक व स्थानिक पोलिस यंत्रणा या जुगारांवर कोणतीच कारवाई करीत नव्हती. दरम्यान, शनिवारी दुपारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जुगारावर छापा टाकून 13 जुगाऱ्यांच्या मुसक्‍या आवळल्या. या कारवाईदरम्यान काही जुगाऱ्यांनी पळ काढला. या कारवाईत जुगारअड्ड्यावरून 19 दुचाकी व रोख रक्कम असा अंदाजे 10 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. नीलेश शेळके व नितीन वास्टर यांच्या या पथकाने ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, याबाबतची पोलिस कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने अटक करण्यात आलेल्या जुगाऱ्यांची व फरार झालेल्या जुगाऱ्यांची नावे समजू शकली नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com