विभागीय आयुक्त अनुपकुमार मंत्रालयात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

विभागीय आयुक्त अनुपकुमार मंत्रालयात
नागपूर : नागपूर विभागाचे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांची आज राज्य सरकारने कृषी व पणन विभागात प्रधान सचिवपदावर बदली केली. अतिरिक्त विभागीय आयुक्त रवींद्र ठाकरे यांची महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक व कुटुंब कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. संजीवकुमार यांची विभागीय आयुक्त कार्यालयात अतिरिक्त आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळतील.

राज्य सरकारने आज मोठ्या प्रमाणात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. गेल्या साडेचार वर्षांपासून असलेले नागपूर विभागाचे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांचा बदली झालेल्या आयएएस अधिकाऱ्यांत समावेश आहे. त्यांना मंत्रालयात पाठविण्यात आले. त्यांच्या पदाचा अतिरिक्त प्रभार अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आलेले डॉ. संजीवकुमार पाहतील. डॉ. संजीवकुमार कुटुंब कल्याण विभागाचे आयुक्त होते. विभागीय आयुक्त कार्यालयातील अतिरिक्त विभागीय आयुक्त रवींद्र ठाकरे यांची महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली. अनुपकुमार गेल्या साडेचार वर्षांपासून नागपूर विभागीय आयुक्त म्हणून होते. या काळात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या कुलगुरूंचा प्रभारही काही काळ सांभाळला. याशिवाय बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांत आभा शुक्‍ला, सुनील चव्हाण, एम. पी. कल्याणकर, प्रदीप पी. राजेश नार्वेकर, अमन मित्तल या आयएएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.