दुष्काळात तेरावा महिना; आगीत गोठा जळून खाक

gotha aag
gotha aag

मोताळा (जि. बुलडाणा) : तालुक्यातील रिधोरा जहाँगीर शिवारात शेतातील गोठ्याला अचानक आग लागल्याची घटना शुक्रवारी (ता.13) सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास घडली. या आगीत गोठ्यातील कुट्टी, इंधन व शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने 80 ते 90 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे.

गावकऱ्यांची सतर्कता
तालुक्यातील रिधोरा जहाँगीर येथील शेतकरी शालीग्राम नारायण कोळसे यांची रिधोरा शिवारातील गट नंबर 38 मध्ये एक एकर शेती आहे. गावालगतच्या शेतात त्यांनी पशुधनासाठी गोठा बांधलेला आहे. या गोठ्यात पशुधनाची कुट्टी, इंधन व शेती उपयोगी साहित्य ठेवलेले होते. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास गोठ्याला अचानक आग लागली. दरम्यान, गावकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. शेजारील गणेश झंवर यांच्या शेतामधील पाणी आणून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या आगीत सुदैवाने जीवित हानी झाली नाही. तसेच पशुधनाला कोणतीच इजा झाली नसल्याचे समजते. परंतु गोठ्यातील कुट्टी, इंधन, शेती उपयोगी अवजारे, टिनपत्रे व इतर साहित्य जळून खाक झाले. त्यामुळे शेतकरी कोळसे यांचे 80 ते 90 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. आगीमुळे संबंधित शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले असून, प्रशासनाने त्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com