पहिल्याच पेपरला 15 कॉपीबहाद्दर जाळ्यात 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

अमरावती  - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला आज, मंगळवारपासून सुरुवात झाली. मात्र, पहिल्याच दिवशी 15 कॉपीबहाद्दरांना मंडळाच्या पथकाने पकडले. त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. 

अमरावती विभागातून 3 लाख 45 हजार विद्यार्थी या परीक्षेला बसलेत. जीवनातील "टर्निंग पॉइंट' असलेल्या बारावीचा आज इंग्रजीचा पेपर होता. या पेपरला जास्त कॉपी होत असल्याने मंडळाचे पथक आधीच सज्ज होते. पेपरला सुरुवात होताच काही वेळात कॉपीबहाद्दर सक्रिय झाले. ही बाब मंडळाच्या पथकाच्या लक्षात येताच धडाक्‍यात कारवाई करण्यात आली. यवतमाळ व वाशीम येथे प्रत्येकी पाच, अमरावतीत तीन, बुलडाण्यात दोन तर अकोल्यात एका कॉपीबहाद्दराला पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

विशेष म्हणजे, मंडळाने कॉपीमुक्त अभियान राबविल्यानंतरही काही केंद्रांत कॉपीबहाद्दरांच्या कारवाया सुरूच राहिल्या. त्यामुळे आता या पुढील पेपरला मंडळाचे पथक अधिक जोमाने सक्रिय राहण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: 15 student caught