
सोमवारपासून शाळा होणार सुरु ; १,५०६ शाळांची घंटा वाजणार
वर्धा : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत वाढत असलेली रुग्णसंख्या बघता राज्य शासनाने १५ फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. शाळा बंदला होणारा विरोध लक्षात घेता सोमवारपासून शाळा सुरू करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. बंदीचा निर्णय जारी होताच जिल्ह्यातील १ हजार ५०६ शाळांची घंटा वाजणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू-बंद असा लपंडाव सुरू झाला. शाळा सुरू होऊन दोन आठवडे होत नाही तोच पुन्हा पाच फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळांना ऑनलाइन शिकवणी वर्ग पर्याय ठेवण्यात आला. गत वर्षापासून ऑनलाइन वर्गावरच शिक्षण सुरू आहे. या ऑवलाइन वर्गात अनेक अडचणी येत असल्याने प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यात यावे यासाठी पालक तसेच शिक्षक आक्रमक झाले होते.विद्यार्थ्याच्या समस्या सोडवायच्या असल्यास त्यासाठी प्रत्यक्ष वर्ग सुरू होणे आवश्यक असल्याने शिक्षक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले होते. शाळा सुरू करण्यासंदर्भात राज्याने सकारातमकता दाखवत अंतिम निर्णय स्थानिक प्रशासनावर सोडण्यात आला.
हेही वाचा: मोबाईल दिला नाही म्हणून वडीलांचे फोडले डोके
कोरोना लसीकरणाला मिळेल गती
शाळकरी विद्यार्थ्याला कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले होते. शाळा बंद असल्याने लसीकरणाची गती मंदावली होती. शाळा सुरू करण्याचा निर्णय झाल्याने कोरोना लसीकरणालाही गती मिळणार आहे. जिल्ह्यात १५ ते १८ वयोगटातील ६४ हजार विद्यार्थ्यांना कोरोना लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, आतापर्यंत २८ हजार ८८१ विद्यार्थ्यांना लस देण्यात आली आहे.
शाळा सुरू करण्यासंदर्भात सर्वाधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. त्या नुसार जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, शाळा सुरू करताना शाळा व्यवस्थापन समिती तसेच पालकांच्या संमतीने शाळा सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
- लिंबाजी सोनवणे,
शिक्षणाधिकारी ( प्राथमिक )
हेही वाचा: सावकारी प्रकरणात शेतकऱ्याचे फोडले डोके
सक्ती नाही
शाळेत विद्यार्थ्याना पाठवावे की नाही हा निर्णय पालकांवर सोपवण्यात आला आहे. विद्यार्थी बिमार असल्यास, किंवा शाळेत पाठवण्यास पालक नकार देत असल्यास त्याला शाळेत येण्यासंदर्भात शाळा प्रशासनाला सक्ती करता येणार नाही.
Web Title: 1506 School Bells Will Ring School Will Start From Monday
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..