चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने १६ मुलांना विषबाधा, एक मुलगी गंभीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोहाडी रुग्णालयात मुलांवर उपचार सुरू

चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने १६ मुलांना विषबाधा, एक मुलगी गंभीर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मोहाडी : आंधळगावजवळील शिवणी (चिंचोली) येथील १६ मुलांनी चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने त्यांना विषबाधा झाली. सर्व मुलांवर मोहाडी ग्रामीण रुग्णालयात (mohadi rural hospital) उपचार सुरू असून, एका मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

हेही वाचा: ''आजारी मुख्यमंत्री-आजारी सरकार'', नारायण राणेंची टीका

शिवणी गावातील ही मुले दुपारी खेळत असताना त्यांनी हटवार यांच्या दुकानामागे असलेल्या चंद्रज्योतीच्या फळातील बिया खाल्ल्या. काही वेळाने मुलांना उलट्या सुरू झाल्या. एकावेळीच गावातील अनेक मुलांना उलट्या सुरू झाल्याने १२ जणांना मोहाडी ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. डॉ. प्रताप गोंधुळे त्यांच्यावर उपचार करीत आहेत. विषबाधा झालेल्यांमध्ये नाहेन सुभाष हटवार(वय ४), कार्तिक माणिक हटवार(वय ७), नैतिक रवी मेहर(वय १३), अंश सुनील ढोणे (वय ७), रुद्र राकेश भोयर(वय ७ ), वेदांत राकेश भोयर(वय ३), उल्हास उदाराम थोटे (वय १२), उत्कर्ष उदाराम थोटे (वय ८), अथर्व विनोद भोयर(वय १३), विहान अजय पुन्हेवन (वय ७), विपलव अजय पुन्हेवन (वय ६), अक्षया प्रवीण मेहर(वय ९), आयुष्या प्रवीण मेहर(वय ६), नितीन रवी मेहर(वय ९), सागर सुभाष बकोरे (वय १०), प्राची महेश बकोरे (वय ६) यांचा समावेश आहे. यातील अक्षया मेहर हिची प्रकृती गंभीर आहे. विषबाधा झाल्याची घटना उघडकीस येताच शिवणी येथील गुड्डू बांते, उदाराम थोटे, विकी मेश्राम, अमोल बुद्धे, राहुल राजूरकर, अक्षय लांजेवार, महेश बपोरे, प्रकाश खडते, नारायण हटवार ग्रामीण रुग्णालयात हजर झाले असून, संबंधितांची मदत करत आहे.

मुलांनी चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने विषबाधा झाली असून, विद्यार्थ्यांना उलट्या सुरू आहेत. अक्षया प्रवीण मेहर हिला जास्त प्रमाणात विषबाधा झाली असून, परिस्थिती नियंत्रणात आहे.
-डॉ. प्रताप गोंधुळे, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, मोहाडी
loading image
go to top