धक्कादायक! तब्बल दीड महिन्यापासून येथील नागरिकांची उडाली झोप.. काय आहे कारण.. नक्की वाचा...

18 hours of load shadding  problem everyday in korchi district
18 hours of load shadding problem everyday in korchi district

कोरची(जि. गडचिरोली) : स्मार्ट सिटी, डिजिटल इंडिया यासारख्या चटपटीत घोषणा सरकारकडून केल्या जात आहेत. मात्र डुरंगं भागात राहणाऱ्या आदिवासींच्या जीवनात अजूनही काळोख आहे. देश कितीही पुढे जात असेल तरी या नागरिकांना मात्र अजूनही यातना सहन कराव्या लागत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील नागरिकांच्या नशिबी अंधारच अंधार आहे.  

छत्तीसगड राज्याच्या सीमेलगत असलेल्या कोरची तालुक्‍याला पूर्वी गोंदिया जिल्ह्याच्या चिचगड येथून वीजपुरवठा केला जात होता. परंतु गोंदिया जिल्हा महावितरण कार्यालयाने कोरची तालुका गडचिरोली जिल्ह्याचा भाग असल्याचे सांगून कोरची तालुक्‍याला होणारा वीजपुरवठा खंडित केला. तेव्हापासून या तालुक्‍याला कुरखेडा येथून वीजपुरवठा केला जात आहे. 

तालुक्‍यात 29 ग्रामपंचायती, 1 नगरपंचायत व 133 गावे आहेत. शिवाय एक पोलिस ठाणे, तीन पोलिस मदत केंद्रे, एक ग्रामीण रुग्णालय, दोन प्राथमिक आरोग्य केंद्रे, तीन आरोग्य पथके यासह राष्ट्रीयीकृत व सहकारी बॅंकांच्या शाखा तसेच अनेक सरकारी व निमसरकारी कार्यालयेही आहेत 

तब्बल 18 तासांचे भारनियम 

तरी आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त कोरची तालुक्‍यात गेल्या दीड महिन्यापासून तब्बल 18 तासांचे भारनियमन केले जात आहे. परिणामी सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरीही त्रस्त झाले आहेत. येथील नागरिकांचे जीवनच अंधारले असून या मुद्यांवरून नागरिकांमध्ये महावितरण विरोधात प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे. 

33 केव्ही विजेची आवश्‍यकता पण...

कोरची तालुक्‍याला 33 केव्ही विजेची आवश्‍यकता आहे. मात्र, पुरवठा केवळ 18 केव्हीचा होत असल्याने चोवीस तासांपैकी 18 तास भारनियमन, तर केवळ 6 तास वीजपुरवठा सुरू आहे. संपूर्ण तालुक्‍याला सलग वीजपुरवठा करणे शक्‍य नसल्याने तीन तुकड्यांत विभागून दोन-दोन तास वीजपुरवठा केला जात आहे.  परंतु चोवीस तासांत केवळ 6 तास तुकड्यांमध्ये वीजपुरवठा होत असल्याने सरकारी कामकाजही ढेपाळले आहे. 

सर्वसामान्यांचे हाल 

शेतकऱ्यांची तर दैनावस्था झाली आहे. पावसाने दडी मारल्याने धानपीक अडचणीत आले आहे. मोटारपंपाने पाणी देतो म्हटले तर भारनियमनाची आडकाठी येत आहे. सर्वसामान्य नागरिकांना रात्री सुखाची झोप घेणेही अवघड झाले आहे. यासंदर्भात नागरिकांनी तक्रार केल्यानंतर महावितरणचे मुख्य अभियंता देशपांडे, अधीक्षक अभियंता अनिल बोरसे, कार्यकारी अभियंता विजय मेश्राम, तसेच अन्य अधिकारी कोरची येथे आले. आश्‍वासन देऊन ते निघून गेले. मात्र, 18 तास भारनियमनाची समस्या जैसे थे आहे. 

गुन्हा दाखल का करू नये ?

कोरची तालुक्‍यातील 18 तासांच्या भारनियमनामुळे नागरिक मेटाकुटीस आले आहेत. हा अरण्यमय परिसर असून साप, विंचू व इतर हिंस्र जनावरांमुळे एखाद्याच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का करू नये, असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत. तसेच या समस्यांसाठी मंगळवार (ता. 4) सर्वपक्षीय चक्‍काजाम आंदोलन करण्याचा इशाराही आंदोलन समिती व नागरिकांनी दिला आहे. 
 
 संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com