1800 प्रश्नांचा भडीमार, उत्तरे दिली बाराचीच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

हिंगणा, ता. 27 ः नागपूर विद्यापीठ बोगस आहे का, कॉलेजच्या मार्गावर बिअरबार टाकण्याचे सरकारचे धोरण आहे का, अभियंत्यांना रोजगार देण्यासाठी काय उपाययोजना आहेत, यासह सुमारे अठराशे प्रश्‍नांचा भडीमार करून विद्यार्थ्यांनी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांना भंडावून सोडले. यापैकी बारा प्रश्‍नांची त्यांनी उत्तरे दिली. उर्वरित सर्व प्रश्‍न सोबत घेऊन गेले. युवा सेनेची "जन आशीर्वाद यात्रा' सुरू असून आदित्य ठाकरे यांच्या संवादाचा कार्यक्रम प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात आज घेण्यात आला.

विद्यार्थ्यांनी सुमारे 1800 प्रश्न तयार केले होते. ते एका डब्यामध्ये गोळा करण्यात आले. यातील जवळपास 12 प्रश्नांना आदित्य ठाकरे यांनी उत्तरे दिली.
शेतकऱ्यांना हमीभाव देण्यास सरकार अपयशी ठरले का, या प्रश्‍नावर राज्य सरकारकडून पावले उचलली आहेत. हमीभावासाठीही भविष्यकाळात ठोस उपाययोजना केल्या जातील. उद्योगांमध्ये मंदीचे सावट निर्माण झाले आहे, याला शासनाचे धोरण जबाबदार आहे का, या प्रश्‍नावर मंदी ही संपूर्ण जगात आहे, याचा आर्थिक व्यवस्थेशी संबंध आहे. याबाबत उपाययोजना करण्यासाठी केंद्र व राज्यस्तरावर नियोजन करणे सुरू आहे. कॉलेजच्या मार्गावर विविध ठिकाणी देशी दारू व बिअरबारसाठी शासनाने परवानगी दिली आहे का, या प्रश्‍नावर संपूर्ण माहिती घेऊन महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाऊल उचलले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. दरवर्षी लाखो विद्यार्थी इंजिनियर होतात, त्यांच्या हातांना काम केव्हा मिळेल, या प्रश्‍नावर मंदी गेल्यानंतर रोजगार मिळेल, असे आश्‍वासन आदित्य ठाकरे यांनी दिले.

नागपूर विद्यापीठ बोगस आहे का?
नागपूर विद्यापीठ बोगस आहे का, असा प्रश्न एका विद्यार्थ्याने विचारला. या विद्यार्थ्याने विद्यापीठाची कहाणी सांगताना अभियांत्रिकीच्या एका विषयात मला 7 गुण मिळाले होते. तो विषय फेरमूल्यांकनासाठी टाकला. नंतर 26 गुण मिळाले. यामुळे सभागृहात शांतता निर्माण झाली. या प्रश्‍नावर आदित्य ठाकरे विद्यापीठाविषयी काय बोलतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र त्यांनी विद्यापीठाविषयी बोलणे टाळले. यामुळे नागपूर विद्यापीठाची नामुष्की टळली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1800 questions galore, answered only twelve