तेलंगणात नेणारी 19 बैलं पकडली ; गोंडपिपरी पोलिसांची कारवाई

संदीप रायपुरे
रविवार, 6 मे 2018

मध्यरात्री धानापूर जंगल मार्गातून 19 बैल घेउन तेलंगणाकडे जात असलेल्या सहा लोकांना गोंडपिपरी पोलिसांनी पकडले. ही बैलं तेलंगणाच्या कत्तलखाण्यात नेण्यात येत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. याप्रकरणी सहा आरोपीविरोधात प्राणी क्रूरता कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गोंडपिपरी (चंद्रपूर) : मध्यरात्री धानापूर जंगल मार्गातून 19 बैल घेउन तेलंगणाकडे जात असलेल्या सहा लोकांना गोंडपिपरी पोलिसांनी पकडले. ही बैलं तेलंगणाच्या कत्तलखाण्यात नेण्यात येत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. याप्रकरणी सहा आरोपीविरोधात प्राणी क्रूरता कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तेलंगणा प्रांत गोंडपिपरी तालुक्याला लागून आहे. यामुळे याभागात चोरटया मार्गाने मोठया प्रमाणावर तस्करी केली जाते. गोंडपिपरीचे ठाणेदार प्रविण बोरकुटे हे आज 6 मे मध्यरात्रीच्या सुमारास पेट्रोलिंगवर होते.यावेळी त्यांना बोरगावातील काही लोकांना बैलांची तस्करी करित असल्याची माहिती मिळाली. हे बैल घेउन ते तेलंगणातील कत्तकखाण्यात नेत असल्याची माहिती त्यांना मिळाली. दरम्यान, यानंतर परिसरात तपासणी केली असता सहा लोक धानापूर जंगल परिसरातून 19 बैल घेउन जात होते. याचवेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील 19 बैलांना जप्त करण्यात आले असून, त्यांची किमंत साधारणत: एक लक्ष नव्वद हजार रूपये एवढी आहे.

सुधाकर भसारकर, रविंद्र निमगडे, राजु जेंगठे, दादाजी चांदेकर, विजय बारसाकडे,मनोज निमगडे अशा सहा आरोपीची नावे आहेत.आरोपी बोरगाव व करंजीतील आहेत.आरोपींवर 166/2017 कलम 11(1) प्राणी क्रूरता कायदा 1960 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक नियती ठाकर,अप्पर पोलिस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत, उपविभागीय पोलिस अधिकारी शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनात गोंडपिपरीेचे ठाणेदार प्रविण बोरकुटे पुढील तपास करित आहेत.

Web Title: 19 arrested in connection with Telangana Gondpipri police action