शहर बससेवेत १९ मिडी बस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

नागपूर - शहर बससेवेत मागील महिन्यांत २५ नव्या बस सुरू करण्यात आल्या. यात आज १९ मिडी बसची भर पडली. या बसेसमुळे दिघोरी, कामठी-कन्हान, खापरखेडा, जयताळा, गोरेवाडावासींचा प्रवास सहज होणार आहे. 

नागपूर - शहर बससेवेत मागील महिन्यांत २५ नव्या बस सुरू करण्यात आल्या. यात आज १९ मिडी बसची भर पडली. या बसेसमुळे दिघोरी, कामठी-कन्हान, खापरखेडा, जयताळा, गोरेवाडावासींचा प्रवास सहज होणार आहे. 

सार्वजनिक बस वाहतूक अत्याधुनिक करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला. ५५ ग्रीन बससह अडीचशे नव्या स्टार बस सुरू करण्यात येत आहेत. यात मागील महिन्यात ५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महापौर प्रवीण दटके यांनी ग्रीन व रेड बसला हिरवी झेंडी दिली होती. आज आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी १९ मिडी बसला हिरवी झेंडी दाखवली. या वेळी महापौर प्रवीण दटके, परिवहन समितीचे सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते. यांच्यासह प्रशासकीय अधिकारी अरुण पिपुरडे, वाहतूक व्यवस्थापक सुकीर सोनटक्के, वाहतूक पर्यवेक्षक रामराव मानकर, तांत्रिक पर्यवेक्षक योगेश लुंगे, उपअभियंता ए. जी. बोथिले आदी अधिकारी उपस्थित होते. प्रदूषणमुक्त सार्वजनिक वाहतुकीसाठी सर्वप्रथम महाराष्ट्रात ग्रीन वाहतुकीला नागपुरातून सुरुवात झाली. या मॉडेलच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशातील इतर महानगरपालिकांमध्ये ही स्मार्ट वाहतूक सुविधा उपलब्ध  होण्याचा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता. नागरिकांना सहज व सार्वजनिक वाहतूक सेवेसाठी चार बस ऑपरेटर यांच्यामार्फत ही पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेची सुरुवात करण्यात आली. नागपुरात धावणाऱ्या या सर्व बसेसमध्ये विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक यांना विशेष पास देण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. 

या मार्गांवर धावणार रेड बसेस
बर्डी ते खापरखेडा, बर्डी ते गोधनी, बर्डी ते दिघोरी (बहादूर फाटा), बर्डी ते कामठी-कन्हान- जे. एन. हॉस्पिटल, बेसा ते गोरेवाडा, पारडी ते जयताळा, बर्डी ते सोनेगाव.

Web Title: 19 midi bus in city bus service