Winter Session
sakal
अमरावती - मेळघाट तसेच अचलपूर परिसरातील पिकांची स्थिती, कुपोषणाचा प्रश्न तसेच अन्य समस्या सोडविण्यासंदर्भात वारंवार निवेदने देऊन व विनंत्या करूनही कोणताच फायदा होत नसल्याने त्रस्त झालेल्या आदिवासी बांधवांनी नागपुरात उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर धडक देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सोमवारी (ता. आठ) सकाळी परतवाड्यातून पदयात्रेला सुरवात होणार असून, पाच दिवसांत तब्बल २०० किलोमीटरची पायपीट करीत ही पदयात्रा अधिवेशनावर धडकणार आहे.