2022 पर्यंत प्रत्येक कुटुंबाकडे स्वतःचे घर असेल : राजकुमार बडोले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

गोरेगाव (गोंदिया) : कॉंग्रेस, राष्ट्रवादी सरकारच्या काळात जेवढी कामे झाली, त्याच्या दुप्पट कामे भाजप सरकारच्या काळात मागील पाच वर्षांत झाली. गोरगरीब, शेतकरी, शेतमजुरांचे हे सरकार आहे. देशातील सर्वांत मोठी कर्जमाफी भाजप सरकारने शेतकऱ्यांना दिली. आता प्रत्येक कुटुंबाला घर देण्याचा प्रयत्न आहे. 2022 पर्यंत प्रत्येक कुटुंबाकडे स्वतःचे घर असेल, असा मला पूर्ण विश्‍वास आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्ष- शिवसेना- आरपीआय (आ) महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांनी केले. तालुक्‍यातील आंबेतलाव येथे बुधवारी (ता. 16) प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

तत्पूर्वी, बडोले यांचे गावागावांतील माता-भगिनींनी फुलांची उधळण करीत स्वागत केले. "अब की बार हॅट्ट्रिक पार, फिर एक बार राजकुमार' अशा घोषणाही नागरिकांनी दिल्यात.
बडोले म्हणाले, की गेल्या पाच वर्षांत आम्ही सर्व समस्या निकाली काढल्या, असा दावा मी करीत नाही. परंतु, पाच वर्षे प्रामाणिकपणे काम केले. कॉंग्रेस, राष्ट्रवादी सरकारच्या काळात जेवढी कामे झाली त्याच्या दुप्पट कामे पाच वर्षांत भाजप सरकारने केली. वेगाने कामे करून महाराष्ट्र बदलण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत केली. देशातील सर्वांत मोठी कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली. आणखी उर्वरित जी कामे आहेत, ती कामे करण्यासाठी तुमची साथ हवी आहे. तुमचा आशीर्वाद मला द्या, विधानसभा क्षेत्रातील समस्या निकाली काढण्याला प्राधान्य नक्कीच देईन.
या वेळी भाजपचे गोरेगाव अध्यक्ष लक्ष्मण भगत, विश्‍वजित डोंगरे, दिलीप चौधरी, किशोर गौतम, झुम्मक बिसेन, खोमेंद्र मेंढे, गिरिधारी बघेले, नितीन कटरे, फलिंद्र पटले, मनोज बोपचे यांच्यासह तालुका पदाधिकारी, बूथप्रमुख, शक्तिकेंद्रप्रमुख, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: By 2022, every family will have their own home: Rajkumar Badole