मेळघाटात 21 मोबाईल टॉवर झालेत "ऍक्‍टीव' 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

अमरावती :  मेळघाटच्या दुर्गम भागात संदेशवहनाची व्यवस्था मजबूत करण्यासाठी लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेले प्रयत्न अखेर विधानसभा निवडणुकीदरम्यान फळाला आले. मेळघाटात तब्बल 21 मोबाईल टॉवर उभे होऊन कार्यान्वित झालेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी "सकाळ'ला दिली. 

लोकसभा निवडणुकीत संदेशवहन यंत्रणा कमकुवत असल्याने संपर्कासाठी वनविभाग तसेच पोलिस दलाच्या बिनतारी संदेश यंत्रणेचा वापर करण्यात आला होता. तत्पूर्वी, मेळघाटात दूरसंचार व्यवस्था मजबूत करण्याचे काम हाती घेण्यात आले. ते लोकसभा निवडणुकीत पूर्णत्वास जाऊ शकले नाही. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मेळघाटात तब्बल 21 मोबाईल टॉवर उभे होऊन कार्यान्वित झाले आहेत. भविष्यात आणखी 20 टॉवर 26 जानेवारीपर्यंत ऍक्‍टीव्ह होतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यासोबत नागापूर, मोरघड, टिटंबा, दिया, जुटपाणी, कळमखार, लवादा, बेरदा यांसह एकूण 68 ग्रामपंचायतींना वायफायची कनेक्‍टीव्हिटी देण्यात आलेली आहे. 50 मीटर परिघातून नागरिकांना दूरसंचार सेवेचा लाभ घेता येईल. सोबतच निवडणुकीतही त्याचा संदेशवहनासाठी यंत्रणेला लाभ होणार आहे. भविष्यात ही संख्या वाढविण्यावर जोर दिला जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 21 mobile towers become 'active' in Melghat