जीव भांड्यात! राजुऱ्यातील 22 कर्मचाऱ्यांचा अहवाल निगेटिव्ह..

coronavirus
coronavirus

राजुरा (जि.चंद्रपूर) : मुंबईहून राजुऱ्यात आलेल्या 27 वर्षीय युवकाचा वैद्यकीय अहवाल रविवारी 31 मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर शहरात खळबळ उडाली होती. त्याच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाचेच धाबे दणाणले होते. त्या सगळ्यांचे विलगीकरण करण्यात आले आणि ताबडतोब त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. चाचणीचा अहवाल येईपर्यंत सगळे गावच चिंतेत होते मात्र सुदैवाने सगळ्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आणि नागरिकांचा जीव भांड्यात पडला.
हा युवक राजुरा येथे संस्थात्मक विलगीकरण कक्षात होता. दरम्यान संस्थात्मक विलगीकरण कक्षात देखरेखीसाठी असणाऱ्या नगरपरिषदेच्या 22 कर्मचाऱ्यांचे सुद्धा विलगीकरण करण्यात आले होते. त्या 22 कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल आज दिनांक 5 जून ला निगेटिव्ह आला आहे. यात 20 नगरपरिषद कर्मचारी व भोजन व्यवस्था सांभाळणाऱ्या 2 व्यक्तींचा समावेश आहे. यामुळे शहरवासियांना दिलासा मिळाला आहे.
कोरोना पॉझिटिव्ह युवक हा मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटी येथून 25 मे रोजी विमानाने नागपूरला आला होता. नागपूर ,चंद्रपूर, राजुरा प्रवास केल्यानंतर त्याला 25 मे रोजी राजुरा येथे संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्याला 30 तारखेला कोरोनाची लक्षणे दिसून आली. 30 ला त्याचा स्वॅब नमुना घेण्यात आला होता. 31 ला रात्री या युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याला चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान नगर प्रशासनाने नाका नंबर 3 वार्ड सील केला आहे. आरोग्य विभागाचे कर्मचाऱ्यांनी परिसराचे निर्जंतुकीकरण केले आहे. आरोग्य विभागामार्फत वॉर्डातील नागरिकांची आरोग्य तपासणी सुरू आहे. वॉर्डातील नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. अत्यावश्‍यक कामासाठीच फक्त प्रवेश देण्यात आलेला आहे. राजुरा शहरातील आदिवासी मुलांच्या वसतीगृहात संस्थात्मक विलगीकरण सुविधा उपलब्ध करण्यात आलेली होती. यांच्या देखरेखीसाठी तीन शिफ्टमध्ये नगरपरिषदेचे 22 कर्मचारी तैनात होते. त्यांचेही विलगीकरण करण्यात आले होते.
आरोग्य विभागाने संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींचे स्वॅब नमुने पाठविले होते. यात 22 व्यक्तींचा अहवाल प्राप्त झालेला आहे. 22 व्यक्तींमध्ये नगर परिषदेचे 20 कर्मचारी व भोजन व्यवस्था सांभाळणाऱ्या दोन व्यक्तींचा समावेश आहे. 22 व्यक्तींचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती मुख्याधिकारी जुही अर्शिया यांनी दिली.

सविस्तर वाचा - उपराजधानीत हत्याकांडांची मालिका, कायदा व सुव्यवस्थेचा उपस्थित झाला प्रश्‍न
सध्या पॉझिटिव्ह युवकाचे कॉन्ट्रक्‍ट ट्रेसिंग सुरू आहे. त्याच्या कुटुंबातील व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मात्र 14 दिवस कुटुंबातील व्यक्ती क्‍वारंटाईन राहतील व पुन्हा स्वॅब नमुने तपासणी होईल. सील केलेल्या वॉर्डातील नागरिकांची आरोग्य तपासणी सुरू आहे. अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्‍टर लहू कुळमेथे यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com