कही खुशी कही गम! यवतमाळात दिवसभरात 23 नवीन कोराना रुग्ण,13 जणांना डिस्चार्ज

carona
carona

यवतमाळ : गुरुवारी दिवसभरात 23 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची जिल्ह्यात भर पडली. तर आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले 13 पॉझिटिव्ह रुग्ण उपचारामुळे बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

आज (दि.9) नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 23 जणांमध्ये 10 पुरूष व 13 महिलांचा समावेश आहे. यात पुसद शहरातील उम्मदनगर येथील एक महिला, यवतमाळ शहरातील तायडे नगर येथील एक महिला, दत्तमंदिर वडगाव येथील तीन महिला आणि एक पुरुष, यवतमाळ शहरातीलच आर्णी रोड येथील एक महिला, उमरखेड तालुक्‍यातील ढाणकी येथील एक पुरूष, पुसद येथील तीन पुरूष व दोन महिला, वणी येथील दोन महिला, दारव्हा येथील एक महिला व एक पुरूष आणि यवतमाळ येथील चार पुरुष व दोन महिला पॉझिटिव्ह आल्या आहेत.

आज (दि.9) नव्याने 23 जण पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 94 झाली आहे. गत 24 तासात वैद्यकीय महाविद्यालयाला 348 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 23 पॉझिटिव्ह आणि 319 रिपोर्ट निगेटिव्ह असून 6 रुग्णांचे निदान होणे बाकी आहे. सद्यस्थितीत वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात 115 जण भरती आहे.
सविस्तर वाचा - शिवभोजन मिळते तर खरे, पण प्लॅस्टिक पिशवीत
जिल्ह्यात सुरुवातीपासून आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 379 वर गेला आहे. यापैकी 272 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली तर जिल्ह्यात 13 जणांच्या मृत्युची नोंद आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आज 34 नमुने तपासणीकरीता प्रयोगशाळेत पाठविले. सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 6501 नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून यापैकी 6275 प्राप्त तर 226 रिपोर्ट अप्राप्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 5896 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.  

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com