यवतमाळचे 24 पीएसआय जिल्ह्याबाहेर

file photo
file photo

यवतमाळ : सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदलीसोबतच पोलिस उपनिरीक्षकांच्या बदलीचे आदेशही अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी मंगळवारी (ता.18) काढले. त्यात यवतमाळ जिल्ह्यातील 24 पोलिस उपनिरीक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली करण्यात आली आहे.
गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे टोळीविरोधी पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक संतोष मनवर यांची बदली अकोला येथे करण्यात आली आहे. बदली झालेल्यांत पीएसआय संजीव खंदारे (अमरावती ग्रामीण), सोपान पाटोळे (अमरावती ग्रामीण), राहुल किटे (अमरावती ग्रामीण), रवी वाहुळे (बुलडाणा), रंगनाथ जगताप (बुलडाणा), अशोक काकडे (अकोला), कवडू चांदेकर (अकोला), पांडुरंग शिंदे (अमरावती ग्रामीण), गणपत पुपूलवार (अमरावती ग्रामीण), सचिन भोडे (अमरावती ग्रामीण), विजय गराड (अमरावती ग्रामीण), जयप्रकाश निर्मल (अमरावती ग्रामीण), सचिन चव्हाण (बुलडाणा), विजय राठोड (बुलडाणा), उमेश नासरे (अमरावती ग्रामीण), मंगेश भोयर (अमरावती ग्रामीण), योगेशकुमार दंदे (बुलडाणा), माया वैश्‍य (अमरावती ग्रामीण), बसवराज तमशेट्टे (बुलडाणा), कौशलेख सिंह (बुलडाणा) यांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आलेले पीएसआय
मंगेश मोहोड, आशीष बोरकर, विनोद जांभळे, रवींद्र मस्कर, रवींद्र रेवतकर, किशोर भुजाडे, धीरज राऊत, श्रीनिवास राठोड, चंद्रकांत ममताबादे, माधुरी यावलीकर, राहुल गुहे, नारायण पांचाळ, गिरीश तोगडवाड, अंकुश राठोड हे पोलिस उपनिरीक्षक अमरावती ग्रामीण, अकोला, वाशीम येथून यवतमाळ जिल्ह्यात बदलून आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com