Maharashtra vidhansabha 2019 : सीव्हिजिल ऍपवर 26 तक्रारी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

नागपूर : सीव्हिजिल ऍपवर दहा दिवसांत 26 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यातील जवळपास सर्वच निकाली काढण्यात आल्या. मतदारयादीतील नाव केंद्र माहिती करण्यासाठी सातशे लोकांनी हेल्पलाईनची मदत घेतली. 

नागपूर : सीव्हिजिल ऍपवर दहा दिवसांत 26 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यातील जवळपास सर्वच निकाली काढण्यात आल्या. मतदारयादीतील नाव केंद्र माहिती करण्यासाठी सातशे लोकांनी हेल्पलाईनची मदत घेतली. 
निवडणूक काळात अनेकांकडून आचारसंहितेचा भंग करण्यात येतो. तक्रार केल्यावरही अधिकारी त्याची दखल घेत नसल्याचे आरोप झाले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने तक्रार करण्यासाठी सीव्हिजिल ऍप तयार केले आहे. यावर येणारी तक्रार संबंधित अधिकारीसोबत थेट आयोगाकडेही येते. यावर येणाऱ्या तक्रारीची 24 तासांच्या आत दखल घेणे बंधनकारक आहे. 21 सप्टेंबर ते 2 ऑक्‍टोबरपर्यंत 26 तक्रारी प्राप्त झाल्या. यातील 21 तक्रारी या पोस्टर व बॅनर संदर्भातील होते. पाच तक्रारी या लोकांनी तपासणीसाठी केल्याचे समोर आले. मतदानाच्या दिवशी मतदानयादीत नाव व केंद्र शोधण्यासाठी धावाधाव होता कामा नये म्हणून व्होटर हेल्पलाइन तयार केली आहे. दहा दिवसांत 764 कॉल यावर प्राप्त झाले. मतदारांच्या सोयीकरिता आयोगाकडून अनेक नवीन उपक्रम सुरू करण्यात आले आहे. याचा फायदाही मोठ्या प्रमाणात नागरिक घेताना दिसत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 26 complaints on the CivilGill app