esakal | सर्वजण घरात बसले होते अन् अचानक जमीन हादरली...
sakal

बोलून बातमी शोधा

vardha earthquake

वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव नाही. मात्र, संपूर्ण देशभरात लॉकडाउन असल्याने जिल्ह्यातही सारे जनजीवन ठप्प आहे. अशा स्थितीत आज दुपारच्या सुमारास सर्व नागरिक आपल्या घरी असताना अचानक आवाजासह जमीन हादरल्याचा अनुभव आला. अनेकांच्या घरातील कपाटात असलेली भांडी त्यामुळे खाली कोसळली.

सर्वजण घरात बसले होते अन् अचानक जमीन हादरली...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

हिंगणघाट (जि. वर्धा) : देशभर कोरोनाचा कहर सुरू असतानाच विदर्भात भूकंपानेही आज हादरा दिला. हिंगणघाट तालुक्‍यातील काही गावांत बुधवारी (ता. 22) रोजी दुपारी 3.30 वाजता भूकंपाचे सौम्य धक्‍के जाणवले. हे धक्‍के साधारणत: 70 सेकंद जाणवत होते. रिश्‍टर स्केलवर त्याची तीव्रता 2.6 एवढी नोंदविण्यात आली. भूकंपाची नोंद मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणावरील भूकंपमापन यंत्रावर झाली. मोर्शीपासून 120 किलोमीटर अंतरावर भूकंपाचे केंद्र असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. या भूकंपात कोणतीही जीवित, वित्तहानी झालेली नाही. 

वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव नाही. मात्र, संपूर्ण देशभरात लॉकडाउन असल्याने जिल्ह्यातही सारे जनजीवन ठप्प आहे. अशा स्थितीत आज दुपारच्या सुमारास सर्व नागरिक आपल्या घरी असताना अचानक आवाजासह जमीन हादरल्याचा अनुभव आला. अनेकांच्या घरातील कपाटात असलेली भांडी त्यामुळे खाली कोसळली. हा अनुभव कानगाव, मोझरी (शेकापूर), कात्री, रोहणखेडा, नांदगाव, भैयापूर, डौलापूर, वरूड आणि कोसुर्ला या गावांतील नागरिकांना आला. जमीन हादरताच परिसरातील नागरिकांनी घराबाहेर निघून अंदाज घेतला असता हा धक्का भूकंपाचे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या भूकंपामुळे परिसरतील नागरिकांत चांगलीच भीती निर्माण झाली आहे. गावकऱ्यांनी याची माहिती हिंगणघाटचे नायब तहसीलदार समशेर पठाण यांना देताच त्यांनी कानगाव गाठून पाहणी केली. 

70 सेकंद धक्के जाणवले : रिश्‍टर स्केलवर 2.6 तीव्रता 
नायब तहसीलदार पठाण यांनी भूकंपाच्या घटनेला दुजोरा दिला. या घटनेची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली असून याबाबतचा सविस्तर अहवाल उद्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. भूकंपाची नोंद मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणावरील भूकंपमापन यंत्रावर दुपारी 3.15 वाजता करण्यात आल्याची माहिती या धरणावरील अभियंता श्री. साने यांनी दिली आहे. यासंदर्भात हवामान विभागाच्या नागपूर येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी नागपूर कार्यालयात भूकंपाची नोंदच नसल्याचे सांगितले. 

मुख्याधिकाऱ्यांच्या बंगल्यावर सुरक्षारक्षक रात्री कर्तव्यावर गेला, अन्‌ सकाळी घडले हे अघटीत...
 

आज दुपारी भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाचे केंद्र अमरावती जिल्ह्यातील मोर्शी शहरापासून 120 किमी अंतरावर वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटकडे होते. 
- डॉ. नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी, अमरावती. 

loading image