27 लाखांनी केली फसवणूक; नाशिक, मुंबईच्या कंत्राटदारांनी लुबाडले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

अमरावती : नाशिक व मुंबई येथील दोन कंत्राटदारांनी शहरातील रघुनाथ जग्गुजी लोखंडे (वय 45 रा. तपोवन) या कंत्राटदराची 27 लाख 50 हजार रुपयांनी फसवणूक केली. फ्रेजरपुरा पोलिसांनी लोखंडे यांच्या तक्रारीवरून पी. एल. अडके (रा. गंगारोड, नाशिक) व कौस्तुभ राणे (वय 40 रा. कल्याण, मुंबई) या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत अमृत योजनेतील सिमेंट कॉंक्रिटीकरण, पेव्हिंग ब्लॉक, पाइप लाइन टाकणे अशा प्रकारची कामे अडके व राणे यांच्या कंपनीकडून अमरावतीच्या लोखंडे यांनी पूर्ण केली. 15 जून 2018 या कालावधीत ही कामे पूर्ण झाली. कामाच्या मोबदल्यात अडके यांच्याकडून दहा लाख, तर राणेकडून 17 लाख 50 हजार असे एकूण 27 लाख पन्नास हजार एवढी रक्कम लोखंडे यांना घेणे बाकी होती. ही रक्कम मागितली असता, त्यांना नाशिक व मुंबईच्या दोन्ही कंत्राटदारांनी जीवे मारण्याची धमकी देऊन, फसवणूक केली, असा आरोप रघुनाथ लोखंडे यांनी तक्रारीत केला. प्रकरणी पोलिसांनी अडके, राणेविरुद्ध फसवणुकीसह जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शुक्रवारी (ता. नऊ) गुन्हा दाखल केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 27 lakh cheats; Nashik, Mumbai contractors Robbed