दीक्षान्त सोहळ्यातील 275 पदके घटली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे दीक्षान्त समारंभात पदक, पारितोषिकांसाठी वाढीव रक्‍कम देण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, पदक आणि पारितोषिकांच्या रकमेत वाढ करण्याच्या योजनेला अल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे यंदाच्या दीक्षान्त समारंभात 275 पदके बाद करण्यात आली. त्यातूनच 106 व्या दीक्षान्त सोहळ्यात 103 विद्यार्थ्यांना 182 पदकांनी सन्मानित केले जाणार आहे. विशेष म्हणजे वाढीव रक्कम देण्याऐवजी बऱ्याच दानदात्यांनी पैसे परत मागितले.

एखाद्या विषयात उत्कृष्ट कार्य करणारी व्यक्ती वा प्रेरणादायी व्यक्‍तिमत्त्वाच्या नावावर विद्यार्थ्यांना पदक मिळावे यासाठी संस्था किंवा दानदात्यांकडून विद्यापीठाला पदक दिले जाते. त्यातूनच विद्यापीठाद्वारे 315 सुवर्ण, 42 रौप्यपदक आणि 100 पारितोषिके असे 457 पदके आणि पारितोषिके प्रदान केली होती. मात्र, विद्यापीठाच्या स्थापनेनंतर बऱ्याच संस्था आणि दानदात्यांनी त्यांच्या आदर्शांच्या नावावर सुवर्ण, रौप्य आणि पारितोषिकासाठी पैसे दिले. कालांतराने विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना पदक देणेच कठीण झाले. त्यातूनच 2008 साली विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. श. नू. पठाण यांच्या कार्यकाळात पदकांसाठी असलेल्या रकमेचा आढावा घेण्यासाठी समिती नेमण्यात आली. या समितीत तत्कालीन व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रामदास आंबटकर आणि डॉ. प्रमोद येवले यांचा समावेश होता. मात्र, त्यातून बऱ्याच दानदात्यांना पत्र पाठवून सध्याची रक्कम पदकांसाठी पुरेशी नसल्याने ती वाढवून देण्याची विनंती करण्यात आली होती. यापैकी 34 दानदात्यांनी सकारात्मक उत्तर दिले होते. यात 172 दानदात्यांकडून सुवर्णपदकासाठी, 28 रौप्य तर 69 पुरस्कार देणाऱ्या 269 दानदात्यांना पुन्हा एक संधी म्हणून पत्र पाठविले. त्यापैकी बऱ्याच दानदात्यांनी वाढीव रक्कम न देता पैसे परत मागितले. तर काहींनी त्याची दखलच घेतली नाही. त्यामुळे अशा 275 दानदात्यांनी दिलेली पदके आणि पारितोषिके रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता दीक्षान्त समारंभात 182 पदके देण्यात येतील. पदकांची संख्या घटल्याने पदके मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही घट झाली.
पदकांची संख्या
सुवर्णपदके - 156
रौप्यपदके - 9
पारितोषिक - 17
एकूण - 182

Web Title: 275 medals in the convocation ceremony decreased