निषेधाच्या ठरावानंतर २८ लाखांचा निधी वितरीत, पणन महासंघाच्या दिरंगाईमुळे अडकले होते पैसे

28 lakh rupees fund distributed to worker by panan mahasangh in yavatmal
28 lakh rupees fund distributed to worker by panan mahasangh in yavatmal

यवतमाळ : कापूस खरेदी केल्यानंतर पणन महासंघ शेतकऱ्यांकडून हमाल व मापाऱ्यांचे पैसे कापून घेते. ही रक्कम गेल्या वर्षभरापासून पणन महासंघाकडे जमा होती. मात्र, त्यानंतरही रक्कम हमाल व मापाऱ्यांना देण्यात आली नाही. त्यामुळे जिल्हा सल्लागार समितीने बैठकीत मुख्यालयाच्या निषेधाचा ठराव घेतला. त्यानंतर मुख्यालयाला जाग आली व 28 लाख रुपयांचा निधी वितरित केला. 

पणन महासंघाच्या केंद्रांवर शेतकऱ्यांनी कापूस विकल्यानंतर त्यांच्याकडून हमाली व मापाऱ्यांचे शुल्क कापले जाते. ती रक्कम पणन महासंघाकडे तशीच जमा राहते. नगदी स्वरुपात निधी आल्यानंतर ते तातडीने संबंधितांना वितरित करणे आवश्‍यक आहे. मात्र, गेल्या वर्षभरापासून पणन महासंघाने हमाल व मापाऱ्यांचे थकीत पैसे दिलेले नव्हते. यासंदर्भात संचालक ययाती नाईक यांनी सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, त्यानंतरही पणन मुख्यालयाने निधी वितरित केला नव्हता. त्यातच कोरोनामुळे पैसे देण्यास आणखी उशीर झाला. शिवाय लॉकडाउनच्यादरम्यान हमाल व मापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात मोलाची भूमिका बजावली. असे असतानाही महासंघाच्या मुख्यालयाकडून निधी देण्यास विलंब झाल्याने हमाल व मापारी यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. 

यवतमाळ झोन अंतर्गत मोठ्या प्रमाणात हा निधी महासंघाकडे शिल्लक होता. यासंदर्भात सातत्याने मागणी करूनही निधी मिळत नसल्याने जिल्हा सल्लागार समितीने थेट मुख्यालयाच्या निषेधाचा ठराव घेतला. त्यामुळे प्रशासन हादरले. तातडीने चक्र फिरली व काही तासांतच जिल्ह्याला 28 लाखांचा निधी मिळाला. त्यामुळे बऱ्यापैकी हमाल व मापाऱ्यांना मदत झाली. नवीन कापूस हंगाम अगदी तोंडावरच आहे. अशातच निधी मिळाल्याने हमाल व मापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

हमाल व मापाऱ्यांचे पैसे मुख्यालयाकडे जमाच होते. त्यांना केवळ ते पाठवायचे होते. मात्र, ते पाठविण्यासाठी बराच विलंब केला. नवीन हंगाम तोंडावर आहे. अशात हमाल व मापाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली असती, तर शेतकऱ्यांची अडचण झाली असती. शेतकऱ्यांची अडचण होऊ नये. त्यामुळे आम्ही कठोर भूमिका घेतली. 
-ययाती नाईक, अध्यक्ष, जिल्हा सल्लागार समिती, पणन महासंघ. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com