फटाक्‍यांच्या धुराने लागते 31 टक्के लोकांना धाप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

नागपूर : दिवाळी हा दिव्यांचा, प्रकाशाचा सण आहे. हा सण फटाके फोडून पारंपरिकरीत्या सर्वत्र साजरा केला जातो. लहान मुले या सणाची उत्सुकतेने वाट पाहतात. कारण त्यांना फटाके वाजवून मजा करायची असते. परंतु बरेच लोक फटाके वाजवल्याने होणाऱ्या जखमांना विसरतात. फटाके वाजवल्याने दमाग्रस्तांना अतिशय जोखीम असते, तर फटाके वाजवल्याने होणाऱ्या धुराने 31 टक्के लोकांना खोकला, छातीमध्ये घरघर आणि धाप लागण्याच्या तक्रारी नोंदवल्याचे एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे.

फटाक्‍यांमुळे भाजण्याची, डोळा किंवा कानाला इजा पोहोचण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी आवश्‍यक ती खबरदारी घेतली जावी. परंतु, फटाक्‍यांमधून सल्फर डायऑक्‍साइड, कार्बन डायऑक्‍साइड, कार्बन मोनॉक्‍साइड, मॅंगनीज आणि काही वेळा कॅडमियम (कर्करोगासाठी कारणीभूत ठरणारा अत्यंत विषारी धातू) अशी प्रदूषके बाहेर पडतात. याकडे कोणाचेही लक्ष नाही. ही प्रदूषके संवेदनशील मार्ग असलेल्या श्‍वसन मार्गावरच आघात करतात. दमा असलेल्या व्यक्तींना याचा त्रास होतो. त्यांना दम्याचा अटॅक येण्याची भीती असते. डॉ. विनोद गांधी यांनी दिलेल्या माहितीनुसार, फटाक्‍यांमध्ये 75 टक्के पोटॅशियम नायट्रेट, 15 टक्के कार्बन आणि 10 टक्के सल्फर असते. फटाक्‍याच्या वातीला आग लावताच सल्फर डायऑक्‍साइड, कार्बन डायऑक्‍साइड, कार्बन मोनॉक्‍साइड, मॅंगनीज आणि कॅडमियमसुद्धा हवेत सोडले जाते. त्याचा फुप्फुसाकडे जाणाऱ्या वायुमार्गाला त्रास होतो व दमा तसेच श्‍वसनसंस्थेचे आजार असलेल्या व्यक्तींना याचा त्रास सुरू होतो.

फटाक्‍यामुळे होणारे त्रास
- छातीत घरघर करणे
- श्‍वसन संस्थेशी संबंधित आजार
- ब्रॉंकायटल अस्थमाची स्थिती खालावणे

फटाक्‍यामुळे प्रदूषकांशी संबंध येताच काही तासांत फुप्फुसाला त्रास होतो. दम्याचा झटका येऊ शकतो.
दम्याचा अटॅक नियंत्रणात ठेवण्यासाठी इन्हेलेशन थेरपी प्रभावी ठरते. इन्हेलर्सच्या वापराविषयी समाजात गैरसमज आहेत. मात्र इनहेल्ड कॉर्टिकोस्टेराइड्‌स ही दम्यावरची परिणामकारक उपचारपद्धती आहे. लहान मुलांसाठीही या औषधांसारखा पर्याय नाही.
- डॉ. विनोद गांधी, बालरोगतज्ज्ञ

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 31% of people suffer from crack smoke