रेल्वेच्या 3.21 दशलक्ष तिकिटांची विक्री

रेल्वेच्या 3.21 दशलक्ष तिकिटांची विक्री
नागपूर, : रेल्वे प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर रेल्वे प्रशासनाने भर दिला आहे. त्याचे सकारात्मक परिणामही दिसून येऊ लागले आहेत. प्रवाशांकडून रेल्वेलाच प्राधान्य दिले जात असून प्रवासीसंख्येत नियमित वाढ सुरू आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात जुलै महिन्यात 3.21 दशलक्ष रेल्वे तिकिटांची विक्री करण्यात आली.
प्रवासी वाहतुकीत अनेक खासगी कंपन्यांनी शिरकाव केला आहे. ग्राहकांना आकर्षित करण्याचे अनेक प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे. यानंतरही रेल्वेच प्रवाशांची पहिली पसंती ठरली आहे. यामुळे तिकीट विक्रीचा आलेख सातत्याने उंचावतो आहे. जुलै महिन्यात करण्यात आलेल्या तिकीट विक्रीतून 20.36 कोटींचे उत्पन्न रेल्वेला प्राप्त झाले. हे प्रमाण गतवर्षी जुलै महिन्याच्या तुलनेत 4.41 टक्के अधिक आहे. तिकीट विक्रीच्या आकडेवारीचा विचार केल्यास दररोज सरासरी 90 हजार तिकीटांची विक्री करण्यात आली. याशिवाय पार्सल बुकिंगमधून 42.68 लाख, माल वाहतुकीतून 16.42 कोटी, खानपानातून 7.64 लाख, पार्किंगद्वारे 8.23 लाखांचा महसूल रेल्वेच्या तिजोरीत जमा झाला. या सर्वच स्रोतांचा विचार केल्यास गतवर्षीच्या तुलनेत उत्पन्नाचा टक्का यंदा अधिक आहे.
40 हजार फुकट्यांकडून दंड वसूल
दपूमरेच्या नागपूर विभागात जुलै महिन्यात राबविण्यात आलेल्या तिकीट तपासणी अभियानादरम्यान 40 हजार 780 फुकटे अडकले. त्यांच्याकडून 1.11 कोटींचा महसूल गोळा करण्यात आला. गतवर्षी जुलै महिन्यात अडकलेल्या फुकट्यांच्या तुलनेत यंदाचे प्रमाण तब्बल 29.21 टक्के अधिक असून त्यांच्याकडून वसूल करण्यात आलेल्या दंडाचे प्रमाण 33.74 टक्के अधिक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com