अमरावतीत पावसाने 324 घरांची पडझड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

अमरावती ः जिल्ह्यात बरसलेल्या पावसामुळे 324 घरांची पडझड होऊन दोन हजार हेक्‍टर शेतीचे नुकसान झाले. पुरामध्ये दोन जनावरे वाहून गेली. पूरपरिस्थितीने सात गावांचा संपर्क तुटला असून अकरा गावांतील विद्युत पुरवठा खंडित झाला. भातकुली, अचलपूर, धारणी, चिखलदरा, धामणगावरेल्वे, धारणी, चांदूररेल्वे आणि तिवसा तालुक्‍याला पावसाचा सर्वाधिक फटका बसला. दर्यापूर, मोर्शी, वरुड, चांदूरबाजार तालुके नुकसानीतून बचावले. भातकुली तालुक्‍यात पाच घरांचे अंशतः तर अचलपूर तालुक्‍यात चार घरांचे अंशतः तर एका घराचे पूर्णतः नुकसान झाले.

अमरावती ः जिल्ह्यात बरसलेल्या पावसामुळे 324 घरांची पडझड होऊन दोन हजार हेक्‍टर शेतीचे नुकसान झाले. पुरामध्ये दोन जनावरे वाहून गेली. पूरपरिस्थितीने सात गावांचा संपर्क तुटला असून अकरा गावांतील विद्युत पुरवठा खंडित झाला. भातकुली, अचलपूर, धारणी, चिखलदरा, धामणगावरेल्वे, धारणी, चांदूररेल्वे आणि तिवसा तालुक्‍याला पावसाचा सर्वाधिक फटका बसला. दर्यापूर, मोर्शी, वरुड, चांदूरबाजार तालुके नुकसानीतून बचावले. भातकुली तालुक्‍यात पाच घरांचे अंशतः तर अचलपूर तालुक्‍यात चार घरांचे अंशतः तर एका घराचे पूर्णतः नुकसान झाले. धारणीसह तालुक्‍यात धुळघाट, हरिसाल, सावलीखेडा येथील 1428 हेक्‍टर क्षेत्रातील शेतीपिकांचे नुकसान झाले. चिखलदरा तालुक्‍यात सेमाडोह येथे नदीच्या पुरात एक गाय व एक गोऱ्हा वाहून गेला, तर माखला येथे तीन घरांचे अंशतः नुकसान झाले. अमरावती तालुक्‍यात एका घराचे पूर्णतः नुकसान झाले. धामणगावरेल्वे तालुक्‍यात जुना धामणगाव, दत्तापूर, तळेगाव, भातकुली, चिंचोली, मंगरूळ दस्तगीर, अंजनसिंगी येथे एकूण 172 घरांचे अंशतः तर भातकुली व मंगरुळ दस्तगीर येथे दोन घरांचे पूर्णतः नुकसान झाले. तळेगाव, भातकुली, चिंचोली, मंगरुळ दस्तगीर, अंजनसिंगी येथे 537.6 हेक्‍टर क्षेत्रातील शेतीपिकांचे नुकसान झाले. चांदूररेल्वे तालुक्‍यात 1 घराचे पूर्णतः तर 130 घरांचे अंशतः नुकसान झाले. तिवसा तालुक्‍यात शेंदोळा खुर्द, शिरजगाव मोझरी येथे पाच घरांचे अंशतः नुकसान झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 324 houses collapse in Amravati