विदर्भात ३३७ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह; शाळा सुरू करायच्या तरी कशा? 

राजेंद्र मारोटकर
Monday, 23 November 2020

जागतिक महामारी ठरलेल्या कोरोना संसर्गाच्या काळात बंद असलेल्या शाळा सुरू करण्याचे निर्देश अखेर राज्य सरकारने दिले. त्यानुसार उद्या, सोमवारपासून शाळेची पहिली घंटा वाजणार आहे. मात्र, कोरोनाच्या सावटात शाळेचा पहिला दिवस कसा जाणार, असा प्रश्‍न शिक्षक, विद्यार्थी, पालकांसह सर्वांनाच पडला आहे. 

नागपूर ः राज्य शासनाने उद्या, सोमवारपासून इयत्ता ९ ते १२ वी पर्यंत वर्ग सुरू करण्याचे निर्देश दिले. मात्र, शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षक व कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार विदर्भात ३३७ शिक्षक पॉझिटिव्ह आढळले आहेत. असे असले तरी बहुतांश शिक्षकांच्या कोविड चाचणीचे अहवाल रात्री उशिरापर्यंत प्राप्त झाले नव्हते. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवसावर संभ्रमाचे ढग गोळा झाले आहेत. 

जागतिक महामारी ठरलेल्या कोरोना संसर्गाच्या काळात बंद असलेल्या शाळा सुरू करण्याचे निर्देश अखेर राज्य सरकारने दिले. त्यानुसार उद्या, सोमवारपासून शाळेची पहिली घंटा वाजणार आहे. मात्र, कोरोनाच्या सावटात शाळेचा पहिला दिवस कसा जाणार, असा प्रश्‍न शिक्षक, विद्यार्थी, पालकांसह सर्वांनाच पडला आहे. 

 

शाळा सुरू करण्याचे नियोजन चुकीचे; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मत

 

अमरावती जिल्ह्यात जवळपास तीन हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तपासणी झाली असून त्यापैकी १२ शिक्षक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील चार हजार ३०० शिक्षक, कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ३४ शिक्षक, कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. वर्धा जिल्ह्यात एकूण ४५ शिक्षक, तर यवतमाळ जिल्ह्यात १४ शिक्षक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

आईच्या हंबरड्याने पोलिसांचेही डोळे पाणावले; घरातून निघून गेलेल्या मुलाचा घेतला फास्टट्र्ॅक शोध
 

गडचिरोली जिल्ह्यातील ३३९९ पैकी १०२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कोरोनाबाधित आढळले. अकोला जिल्ह्यात ३३, वाशीम जिल्ह्यात ८ व बुलडाण जिल्ह्यात ३२ शिक्षक पॉझिटिव्ह आढळले आहेत. भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील शिक्षकांच्या कोविड तपासणी शनिवार पर्यंत झाली आहे. मात्र अद्याप अहवाल आले नाही. नागपूर जिल्ह्यात ४१, तर नागपूर शहरात १६ शिक्षक पॉझिटिव्ह आढळले आहेत. 

विदर्भातील जिल्हानिहाय कोरोनाबाधित शिक्षक 

अकोला ३३, वाशीम ०८, बुलडाणा ३२, अमावती १२, यवतमाळ १४, वर्धा ४५, चंद्रपूर ३४, गडचिरोली १०२, नागपूर ५७, एकूण ३३७ 

संपादन ः राजेंद्र मारोटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 337 teachers in Vidarbha corona positive; How to start schools?