
नागपूर जिल्ह्यात आज ११८१ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निष्पन्न झाले. अमरावती जिल्ह्यातही संख्या वाढतीच असून तेथे ८०२ नवे रुग्ण आढळलेत. दोन्ही जिल्ह्यात १०-१० रुग्णांचा मृत्यूही झाला. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.
नागपूर : विदर्भात कोरोनाचा कहर सर्वत्र सुरू असून अमरावती विभागातील पाचही जिल्हे व नागपूर जिल्ह्यात त्याची तीव्रता आणखी वाढली आहे. पूर्ण विदर्भात आज बुधवारी (ता. २४) ३४८३ रुग्ण कोरोना पॉझटिव्ह आढळले असून २९ रुग्णांचा मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्याने तर आज हजाराचा आकडाही ओलांडला.
नागपूर जिल्ह्यात आज ११८१ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निष्पन्न झाले. अमरावती जिल्ह्यातही संख्या वाढतीच असून तेथे ८०२ नवे रुग्ण आढळलेत. दोन्ही जिल्ह्यात १०-१० रुग्णांचा मृत्यूही झाला. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. अमरावतीत मंगळवारी (ता.२३) एकाच दिवशी ९२६ रुग्ण आढळून आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाकडून २२ फेब्रुवारीपासून १ मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.
अधिक वाचा - आज कलेक्टर डिक्लेअर सुट्टी; कॅलेंडरच्या तारखेतून घडला मेळघाटातील पहिला जिल्हाधिकारी
लॉकडाउन सुरू झाल्यानंतरही दररोज ७०० ते ८०० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विभागनिहाय विचार करता विदर्भात आज आढळून आलेल्या एकूण ३४८३ रुग्णांमध्ये अमरावती विभागातील पाच जिल्ह्याचा वाटा तब्बल २०४३ रुग्णांचा आहे. या विभागात मृत्यूही १६ जणांचे झालेत. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १४४०, तर मृतांची संख्या १३ आहे.
अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असून बुधवारी एकाच दिवशी १० जणांचा मृत्यू झाला. तसेच ८०२ नवे रुग्णदेखील आढळून आले. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. विशेष म्हणजे मंगळवारी एकाच दिवशी विक्रमी ९२६ रुग्ण आढळून आले होते. सहा जणांचा मृत्यू झाला होता.
जाणून घ्या - कुटुंबीयांसोबतचे 'ते' जेवण ठरले अखेरचे, घराच्या दिशेने निघालेल्या 'बरखा'वर काळाचा घाला
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाकडून २२ फेब्रुवारीपासून १ मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाउन सुरू झाल्यानंतरही दररोज ७०० ते ८०० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. त्यामळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची व मृतांची जिल्हा निहाय संख्या
जिल्हा | पॉझिटिव्ह | मृत्यू |
अमरावती | ८०२ | १० |
यवतमाळ | २१५ | १ |
अकोला | ३४० | २ |
बुलढाणा | ३६८ | ४ |
वाशीम | ३१८ | ० |
नागपूर | ११८१ | १० |
वर्धा | १९२ | २ |
चंद्रपूर | ३४ | ० |
गडचिरोली | ९ | ० |
भंडारा | १४ | ० |
गोंदिया | १० | ० |
एकूण | ३४८३ | २९ |