यवतमाळमध्ये ३५ हजारांवर को-मॉर्बिड रुग्ण, सर्वेक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यात रुग्णसंख्येत घट

35 co morbid patients found in yavatmal
35 co morbid patients found in yavatmal

यवतमाळ : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनातर्फे 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहिम जिल्ह्यात दोन टप्प्यांत राबविण्यात आली. त्यात 35 हजार 470 को-मॉर्बिड (विविध आजार असलेले) व्यक्ती आढळून आले आहेत. पथकांच्या सर्वेक्षणात कोविड, सारी, आयएलआयचे रुग्णही समोर आले आहेत.

गेल्या 15 सप्टेंबर ते दहा ऑक्‍टोबर व 14 ते 24 ऑक्‍टोबर या कालावधीत विविध पथकांनी घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण केले. दोन हजार 50 पथकांत सहा हजार 150 कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. जिल्ह्यातील शहर, गाव, पाडे, वस्त्या, तांडे येथील प्रत्येकांची तपासणी करण्यात आल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. ग्रामीण भागातील 21 लाख 17 हजार 357, तर शहरी भागातील साडेसात लाख नागरिकांचा यात समावेश आहे. पहिल्या टप्प्यात 45 हजार 716 को-मॉर्बिड (बीपी, शुगर, हार्ट, किडनी, असे विविध आजार) आढळून आलेत. कोविड संशयितांची संख्या 2456 समोर आलेत. त्यातील 788 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 135 पॉझिटिव्ह निघालेत. सदी, खोकला (आयएलआय) असलेले 1,224 निघालेत. त्यापैकी 232 जणांची तपासणी करण्यात आली. त्यात 34 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत. 

सारीचे 28 रुग्ण आढळून आलेत. 17 जणांच्या कोरोना तपासणीत नऊ पॉझिटिव्ह आलेत. कोविड रुग्णालयात 425 जणांना दाखल करण्यात आले. त्यात 30 पॉझिटिव्ह निघालेत. दुसऱ्या टप्प्यात को-मॉर्बिडच्या संख्येत घट झाली. सर्वेक्षणात 35 हजार 470 को-मॉर्बिड आढळून आलेत. 1,934 कोरोना संशयितांची नोंद करण्यात आली. 151 जणांची तपासणी करण्यात आली. त्यात केवळ आठ पॉझिटिव्ह निघालेत. आयएलआय असलेले 525 समोर आलेत. 140 जणांच्या तपासणीत 19 पॉझिटिव्ह निघालेत. सारीच्या सात रुग्णांपैकी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. 330 जणांना दाखल करण्यात आले. त्यापैकी 26 जणांच्या तपासणीमध्ये 16 रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत. कोरोनाची रुग्णसंख्या वाढली असताना जिल्ह्यात 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम राबविण्यात आली. पहिल्या टप्प्यापेक्षा दुसऱ्या टप्प्यात को-मॉर्बिड, सारी, आयएलआय, कोविड पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट झाली. आरोग्य विभागाच्या मोहिमेमुळे नागरिकांच्या आरोग्याची कुंडलीही स्पष्ट झाली.

'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी मोहीम होती. सर्वच पथकांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले. को-मॉर्बिड, सारी, आयएलआयचे आकडेही समोर आलेत. या मोहिमेमुळे गंभीर रुग्णांवर वेळीच उपचार करता आलेत. त्यामुळे जिल्ह्यात दिलासा मिळाला.
- डॉ. हरी पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com